पालिकाच ‘उघड्यावर’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:42 IST2017-07-25T00:41:04+5:302017-07-25T00:42:54+5:30
बीड : शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी भल्या पहाटे रस्त्यावर फिरून उघड्यावर जाणाऱ्यांविरोधात बीड पालिका कारवाई करताना दिसून येत आहे.

पालिकाच ‘उघड्यावर’!
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी भल्या पहाटे रस्त्यावर फिरून उघड्यावर जाणाऱ्यांविरोधात बीड पालिका कारवाई करताना दिसून येत आहे. परंतु चक्क नगर पालिका वाहनतळातच कर्मचाऱ्यांसह नागरिक उघड्यावर शौचास जात आहेत. याकडे त्यांचे दूर्लक्ष होत आहे. इकडे सर्वसामान्यांवर कारवाईचा बडगा उगारून बदनामी करीत पोलीस ठाण्यात नेणारी पालिकाच ‘उघड्यावर’ जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यावरून ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान....’ अशी गत पालिकेची झाली आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मागील काही दिवसांपासून बीड नगरपालिकेने शहर स्वच्छतेसह हागणदारी मुक्तीसाठी कठोर पावले उचलली आहेत. वेगवेगळ्या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची ‘गुड मॉर्निंग’ पथके स्थापन करून भल्या पहाटे त्यांना उघड्यावर जाणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर यांनी दिले आहेत. वास्तविक पाहता इतरांवर कारवाई करणाऱ्या नगरपालिकेतच ‘अंधार’ असल्याचे दिसून येत आहे. यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.