शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पैठण रस्त्याच्या रूंदीकरणाचा मुहूर्त ठरला; एप्रिलमध्ये नितीन गडकरी करणार भूमिपूजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 13:53 IST

केंद्रीय दळणवळण खात्याच्या भारतमाला योजनेंतर्गत औरंगाबाद ते पैठण या मार्गाच्या चौपदरीकरणाचा समावेश करण्यात आला आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद ते पैठण एनएच क्रमांक ७५२-ईचे रूंदीकरण १२ वर्षांपासून रखडले होते. त्याला आता मुहूर्त लागणार आहे. २४ एप्रिलला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रूंदीकरण कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. ९०० ते १ हजार कोटींच्या आसपास सदरील रस्त्याचे काम अपेक्षित आहे. त्यासाठी लवकरच अधिसूचना निघणार आहे. १२ वर्षांपासून हा सगळा प्रवास ‘लोकमत’ने वारंवार शब्दबद्ध केला आहे.

पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसी, एनएचएआय अशा तीन यंत्रणांच्या कचाट्यांतून हा रस्ता बाहेर पडण्यासाठी एक तपाचा कालावधी गेला. सन २०१० मध्ये पीडब्ल्यूडीकडून ३०० कोटींतून रस्ता केला जाणार होता. नंतर, राज्य रस्ते विकास महामंडळाने त्या मार्गासाठी डीपीआर तयार केला. मग, एनएचएआयकडे कामाची जबाबदारी देण्यात आल्याने पुन्हा एबीसीडी असा प्रवास सुरू झाला. औरंगाबाद ते पैठण ६० कि.मी. पैठण ते शेवगाव ३० किमी, पुढे २० किमी. तिसगावपर्यंत व तेथून पुढे ३० किमी अहमदनगरपर्यंत या मार्गाचे चौपदरीकरण प्रस्तावित करण्यात आले. त्यात राज्य महामार्ग आणि एनएचएआय या दोन संस्थांमध्ये दुमत असल्याने काम रखडले. १४० कि.मी.पर्यंत या मार्गासाठी १४०० कोटींच्या आसपास खर्च लागणार होता नंतर, औरंगाबाद ते पैठण या सुमारे ५५ ते ६० कि.मी. अंतराचा विचार करण्यात आला.

रस्त्याचा ‘भारतमाला’मध्ये समावेशकेंद्रीय दळणवळण खात्याच्या भारतमाला योजनेंतर्गत औरंगाबाद ते पैठण या मार्गाच्या चौपदरीकरणाचा समावेश करण्यात आला. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ‘लोकमत इन्फ्रास्ट्रक्चर कनक्लेव्ह’ या कार्यक्रमात त्या मार्गाचे चौपदरीकरण करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) करण्याची घोषणा झाली; परंतु डीपीआरच्या कामात अनेक अडथळे आले. आता त्या रस्त्याचे भूमिपूजन होणार आहे.

एनएचएआयची माहिती अशीडांबरीकरणातून चौपदरीकरण केले जाईल. दोन उड्डाणपूल त्या रस्त्यावर प्रस्तावित आहेत. नक्षत्रवाडी, गेवराई तांडा येथे पूल, सर्व्हिस रोड होईल. दिल्लीच्या ईजीस इंटरनॅशनल या संस्थेने डीपीआरचे काम केले आहे. शहर पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीसाठी जागा देण्याचे निश्चित झाले आहे. पुढच्या महिन्यांत भूमिपूजन होऊ शकते.- अरविंद काळे, प्रकल्प संचालक, एनएचएआय

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग