शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

शिवरायांचे हस्तलिखित पैठणमध्ये; कावळे परिवाराकडे आहे शिवकालीन पत्रांचा अनमोल ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:32 PM

देशाची दक्षिण काशी असलेल्या पैठणच्या कावळे परिवाराकडे शिवकालीन हस्तलिखितांचा हा अनमोल ठेवा आजही उपलब्ध आहे. त्यात शिवरायांची हस्तलिखितेही आपण पाहू शकतो. 

ठळक मुद्देप्रतिष्ठाननगरीतील आतल्या नाथमंदिराच्या रस्त्यावर कावळे गल्ली आहे. तेथेच प्रकाश कावळे यांचे निवासस्थान आहे. च्याकडे छत्रपती शिवाजी महाराज ते हरजी भोसले (सन १६७६-१८५०) यांच्या २४० वर्षांच्या कालखंडात झालेल्या पत्रव्यवहाराची मूळ पत्रे संग्रही आहेत.कावळे परिवाराच्या ११ पिढ्यांनी जिवापाड जपलेल्या शिवकालीन हस्तलिखितांचा अमूल्य ठेवा कावळे यांचे वंशज आजही तेवढ्याच गांभीर्याने जतन करीत आहेत.

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी,’ अशी महती आपण शिवरायांची गातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यकथा वाचून आपण त्यांच्या महाप्रतापी रूपाची कल्पना करू शकतो. महाराजांचे हस्ताक्षर अनेकांनी ग्रंथ, पुस्तकातून पाहिले असेलही; परंतु त्यांचे मूळ हस्तलिखित पाहण्याचा योग दुर्लभच. देशाची दक्षिण काशी असलेल्या पैठणच्या कावळे परिवाराकडे शिवकालीन हस्तलिखितांचा हा अनमोल ठेवा आजही उपलब्ध आहे. त्यात शिवरायांची हस्तलिखितेही आपण पाहू शकतो. 

प्रतिष्ठाननगरीतील आतल्या नाथमंदिराच्या रस्त्यावर कावळे गल्ली आहे. तेथेच प्रकाश कावळे यांचे निवासस्थान आहे. त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज ते हरजी भोसले (सन १६७६-१८५०) यांच्या २४० वर्षांच्या कालखंडात झालेल्या पत्रव्यवहाराची मूळ पत्रे संग्रही आहेत. कावळे परिवाराच्या ११ पिढ्यांनी जिवापाड जपलेल्या शिवकालीन हस्तलिखितांचा अमूल्य ठेवा कावळे यांचे वंशज आजही तेवढ्याच गांभीर्याने जतन करीत आहेत. एका पिढीपासून दुसर्‍या पिढीकडे हा वारसा सुपूर्द करीत आहेत. 

याविषयी ७२ वर्षीय प्रकाश कावळे यांनी सांगितले की, ज्येष्ठ शुद्ध १२ शके १५९६ (सन १६७४) रोजी शिवाजी महाराज यांचा शानदार राज्याभिषेक सोहळा पार पडला. त्याचे पौरोहित्य काशीच्या गागाभट्टांनी केले होते. हे गागाभट्ट मूळचे पैठणचे होते. त्यांचे उपनाम कावळे होते. वेदाध्यायन व उपाध्येपण करणारी अशी भट्ट नावे असणारी तेव्हा बारा घराणी पैठणला विख्यात होती. 

राज्याभिषेकाच्या वेळी वेदशास्त्र संपन्न गागाभट्ट यांना पैठणचे गोविंद भट कावळे यांनी साथ दिली होती. कावळे घराणे गागाभट्टांचे वंशज असून, राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी गोविंद भट यांना पैठणचे उपाध्येपण बहाल केले होते. त्याकाळी तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी पूजा-अर्चा करण्यासाठी उपाध्याय नेमण्याची प्रथा होती. यजमान धार्मिकविधीसाठी तीर्थक्षेत्री यायचे. लॉज नसल्यामुळे त्याकाळी उपाध्यांच्या घरीच थांबायचे. विधी आटोपला की, दक्षिणा देऊन क्षेत्र सोडायचे. त्या काळात यजमान आणि त्यांच्यासोबत आलेले इतर यांची नोंद एका वहीत करून ठेवली जायची. त्यानंतर अनेक वर्षे छत्रपती भोसले घराणे व कावळे घराण्यादरम्यान पत्रव्यवहार झाला. ते सर्व हस्तलिखित पत्रे जतन करून ठेवली आहेत.कावळे परिवाराने यातील काही हस्तलिखिते स्व. बाळासाहेब पाटील यांच्या संग्रहालयात दिली आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या संग्रही छत्रपती संभाजी महाराजांचे हस्तलिखितही आहे. हस्तलिखितांचा मजकूर मोडी लिपीतील आहे. कावळे यांनी मोडीलीपीतील जाणकारांकडून या पत्रांचा मराठी व इंग्रजी भाषेत अनुवाद करून घेतला आहे. प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची हस्तलिखिते पाहण्यास मिळणे हा दुर्मिळच योग होय. 

संग्रहात असलेली हस्तलिखिते प्रकाश कावळे यांच्या संग्रहात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्रांसह मानकोजीराजे भोसले, परसोजीराजे भोसले, व्यंकोजीराजे भोसले, शाहूराजे भोसले, संताजीराजे भोसले, मुधोजीराजे भोसले, मल्हारराव होळकर, राणोजीराजे भोसले (हिंगणीकर),भगवानराव राजे शिर्के, रामभट्ट बंदिष्ठी व हरजी भोसले यांची पत्रे सुस्थितीत आहेत.

हस्तलिखित : छत्रपती शिवाजी महाराजांचे  

पैठण येथील उपाध्ये म्हणून आपल्यास मान्यता देण्यात आली आहे. भोसले घराण्यातील वंशज जेव्हा जेव्हा तीर्थक्षेत्री येतील तेव्हा तेव्हा त्यांना वंशवळी दाखविण्यात यावी, असे छत्रपती शिवाजी महाराजांनी मोडी लिपीत लिहिलेल्या मजकुरात म्हटल्याचे संग्राहक प्रकाश कावळे यांनी सांगितले. 

छत्रपती संभाजी महाराजांचे 

छत्रपती संभाजी महाराज यांनी १० ओळींचे पत्र मोडीलिपीत लिहिलेले आहे. या पत्रात असे स्पष्ट लिहिले आहे की, ते ज्या वेळेस पैठणला येतील तेव्हा कावळे यांनी शहाजीराजे आणि शिवाजीराजे या दोघांची पत्रे दाखवावीत. ती जर दाखविली नाहीत तर कावळे यांची उपाध्येपदावरील नेमणूक रद्द समजली जाईल. १८ जून १६८९ रोजी लिहिलेल्या पत्रावर त्यांची राजमुद्रा नसली तरी ‘मर्यादेयं विजयते’अशी मर्यादामुद्रा आहे. 

संशोधनाची आवश्यकता

आमच्या ११ पिढ्यांनी शिवकालीन हस्तलिखिते जपून ठेवली आहेत. या ऐतिहासिक दस्तावेजावर संशोधन झाले तर नवीन माहिती समाजासमोर येऊ शकेल. यासाठी इतिहासाचे अभ्यासक, संशोधकांनी पुढाकार घ्यावा. त्यांना कावळे परिवार सहकार्य करेल. पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांनीही शिवकालीन हस्तलिखिते पाहिली आहेत. - प्रकाश कावळे, संग्राहक, शिवकालीन हस्तलिखिते.