शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कार रिव्हर्स घेताना जायकवाडीच्या कालव्यात पडली; दाम्पत्यासह मदतीला धावलेला तरुणही बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 11:47 IST

जायकवाडीच्या उजव्या कालव्यात कार कोसळून भीषण अपघात; तिघांचा जलसमाधीचा धोका, पैठणमध्ये शोधमोहीम सुरू

पैठण: पैठण तालुक्यातील चांगतपुरी शिवारात सोमवारी मध्यरात्री ११ वाजेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. कार रिव्हर्स घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट जायकवाडीच्या उजव्या कालव्यात कोसळली. या अपघातात कारमधील दाम्पत्य वाहून गेले असून, त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतलेला स्थानिक तरुणही बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

रस्ता चुकला अन् घात झालाअहिल्यानगर जिल्ह्यातील कोरडगाव (ता. पाथर्डी) येथील मुकीद अहमद शेख (३५), निलोफर मुकीद शेख (३०) आणि चालक अल्ताफ पठाण हे पिंपळवाडीकडे निघाले होते. चांगतपुरी गावाजवळील पुलावर आले असता चालक रस्ता चुकला. कार मागे (रिव्हर्स) घेत असताना अचानक नियंत्रण सुटले आणि कार थेट भरून वाहणाऱ्या कालव्यात कोसळली.

मदतीला धावलेला तरुणही बेपत्ताकार पाण्यात पडल्याचे पाहताच स्थानिक ग्रामस्थ मदतीला धावले. चांगतपुरी येथील रावसाहेब गणपत खडेकर (४०) या तरुणाने दाम्पत्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली, मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने तो स्वतःही वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चालक अल्ताफ पठाण याने कसाबसा आपला जीव वाचवला असून त्याच्यावर पैठण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रात्रीपासून शोधमोहीम सुरूघटनेची माहिती मिळताच पैठण पोलीस ठाण्याचे पोनि. महादेव गोमारे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीच्या साहाय्याने कार कालव्याबाहेर काढण्यात आली, मात्र मुकीद शेख, निलोफर शेख आणि रावसाहेब खडेकर यांचा अद्याप शोध लागलेला नाही. तहसीलदार यांनी जिल्हास्तरावरून आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव पथकाला पाचारण केले असून, शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Car plunges into canal in Paithan; three feared drowned.

Web Summary : A car accident in Paithan resulted in a couple and a rescuer going missing after the vehicle plunged into a canal. The driver survived, and search operations are underway to locate the missing individuals.
टॅग्स :Accidentअपघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर