पीक विम्यासाठी शेतकरी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 23:55 IST2017-07-27T23:55:39+5:302017-07-27T23:55:39+5:30

परभणी : जिल्ह्यात विमा स्वीकारण्याचे पोर्टल बंद पडल्याने संतप्त झालेल्या शेतकºयांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाची भेट घेवून विमा भरून घेण्यासाठी जिल्ह्यातील बँकांना आदेश द्यावेत, तसेच मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी केली़

paika-vaimayaasaathai-saetakarai-rasatayaavara | पीक विम्यासाठी शेतकरी रस्त्यावर

पीक विम्यासाठी शेतकरी रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पीक विमा भरण्यासाठी मुदत संपत असतानाच गुरुवारी अचानक पोर्टल बंद पडल्याने शेतकºयांची धांदल उडाली़ त्यामुळे महा-ई-सेवा केंद्र आणि बँकांसमोर मोठ्या संख्येने रांगेत उभ्या असलेल्या शेतकºयांनी संताप व्यक्त केला़ दरम्यान विम्याची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी करण्यासाठी शेतकºयांसह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली़ मात्र तेथेही या कार्यकर्त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही़
खरीप पीक विमा भरण्यासाठी शासनाने ३१ जुलैची मुदत दिली आहे़ राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि महा-ई-सेवा केंद्रावरून शेतकºयांना विमा भरता येणार आहे़ मुदत संपत असल्याने विमा भरण्यासाठी शेतकºयांची गर्दी झाली होती़ बँकांसह महा-ई-सेवा केंद्रांमध्ये रांगा लागल्या होत्या़ त्यातच पोर्टल बंद पडल्याने सर्व कामकाज ठप्प झाले़ त्यामुळे शेतकºयांनी संताप व्यक्त केला़ जिल्ह्यात विमा स्वीकारण्याचे पोर्टल बंद पडल्याने संतप्त झालेल्या शेतकºयांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाची भेट घेवून विमा भरून घेण्यासाठी जिल्ह्यातील बँकांना आदेश द्यावेत, तसेच मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी केली़ तसेच जिल्ह्यातील वगळलेल्या सर्व मंडळांना पीक विम्याची रक्कम द्यावी, अशी मागणी करण्यात आली़ यावेळी जिल्हाध्यक्ष माणिक कदम, अनंत कदम, केशव अरमळ, शेख जाफर, सदाशिव साखरे, बाळासाहेब कदम, मो़ नाईकतकी, गजानन दुगाने, किशोर ढगे, विकास भोपाळे आदींची उपस्थिती होती.
तांत्रिक अडचणी वाढल्या
शेतकरी सभासदांचा पीक विमा भरण्याची सुविधा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे़ हा विमा शासनाच्या आॅनलाईन पोर्टलवर भरणे अनिवार्य केले असून, संकेतस्थळावरील उपलब्ध माध्यमाद्वारे भरलेली माहितीच ग्राह्य धरली जाणार आहे़ ज्या ठिकाणी इंटरनेट नाही, अशा ठिकाणी संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या आॅफलाईन युटीलिटीचा वापर करण्याच्या सूचना आहेत़ हे आॅफलाईन युटीलीटी पोर्टल बँकेच्या प्रत्येक शाखेला दिले आहे़ परंतु, त्यात तांत्रिक अडचणी येत असल्याचे जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कळविले़ या अडचणी दूर न झाल्याने विमा रक्कम भरून घेणे अडचणीचे होत आहे़ आॅफलाईन युटीलिटी पोर्टलमध्ये १० ते १२ अर्ज भरल्यानंतर पुढील सभासदांची माहिती भरताना यापूर्वीच्या सभासदांची पिकांची माहितीच जशीच्या तशी पुढील अर्जावर दिसत आहे़ त्याच प्रमाणे पोर्टलवर बचत खाते क्रमांक आठ अंकी भरण्याची सुविधा आहे़ प्रत्यक्षात बँकेच्या बचत खात्याचे क्रमांक १५ अंकी आहेत़ त्यामुळे अर्ज अपलोड होत नाहीत़ त्यामुळे शेतकरी पीक विम्याच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहू शकतात़ तेव्हा पोर्टलमधील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतरच पीक विमा भरून घेतला जाईल, यासाठी बँक प्रशासन वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करीत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.जी.जाधव यांनी सांगितले़

Web Title: paika-vaimayaasaathai-saetakarai-rasatayaavara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.