औरंगाबाद- जालना रोडवरील मोंढा उड्डाणपूल व क्रांती चौकातील भाजपने होर्डिग लावून "कमल का बटन दबाये,भाजपको जीताय" असे आव्हान करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र होर्डिग लावलेले ठिकाण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात येते. ...
किरकोळ कारणावरून रात्री झालेल्या हाणामारीतून जीम ट्रेनरला मारहाण करण्यासाठी आलेल्या तीनपैकी एका जणाने गावठी पिस्टलमधून गोळी झाडल्याचा प्रकार बुधवारी सकाळी शिवाजीनगर येथे घडला. झाडलेली गोळी थेट न जाता वर उडून पडल्याने सुदैवाने तरुणाचे प्राण वाचले. या ...
भोळ्या भाबड्या भाविकांना स्वस्तात हज आणि उमराची यात्रा करून आणण्याचे आमिष दाखवून १६० जणांकडून ५४ लाख रुपये गोळा करून पसार झालेल्या टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाला जिन्सी पोलिसांनी राजस्थानमध्ये पकडले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात समता, स्वातंत्र आणि बंधुता ही लोकशाहीची तीन आधारमूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतली आहेत, असा जाणीवपूर्वक खोटा आरोप आणि अपप्रचार केला जात आहे. बाबासाहेबांनी ही तीन आधारमूल्ये तथागत गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानातून ...
उद्योग वाढीसाठी शासनाने उद्योजकांसाठी पॅकेज प्रोत्साहन योजना सुरु केली. या योजनेत सहभागी होण्यासाठी शासनाने प्रस्ताव आॅफलाईन पद्धतीने घ्यावेत, अशी मागणी उद्योजकांकडून केली जात आहे. ...
वाळूजमहानगर परिसरात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असून, विकतच्या पाण्यावर आगामी दोन महिने भिस्त राहणार आहे. ...
भर वर्गात अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत लैंगिक चाळे करणारा शिक्षक सोहेल अब्दुल रऊफ पठाण (२७, रा. कटकटगेट, औरंगाबाद) याला बुधवारी (दि.१०) विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी १४ वर्षे सश्रम कारावास आणि साडेपाच हजार रुपये दंड ठोठावला. ...
‘वीरप्पनसारखा (मिश्यांवर पीळ देऊन, हातवारे करून) तो गडी अभिनंदन आणला की नाही अवघ्या ६० तासांत परत,’ अशा शब्दांत हवाई दलातील वैमानिक अभिनंदन वर्धमान यांची विकृत तुलना वीरप्पनसारख्या कुख्यात दरोडेखोराशी बीड जिल्ह्यातील भाजपचे आ. सुरेश धस यांनी केली. ...