रस्त्याच्या कामाला मिळेना गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:07 IST2017-11-13T00:07:13+5:302017-11-13T00:07:19+5:30
शहरातील जिल्हा स्टेडियम परिसरात रस्त्याचे काम दोन महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे़ या कामामुळे वाहनधारकांबरोबरच या भागातील व्यावसायिक त्रस्त झाले आहेत़ महापालिकेने कंत्राटदारांकडून सातत्यपूर्ण काम करून घ्यावे, अशी मागणी जोर धरत आहे़

रस्त्याच्या कामाला मिळेना गती
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील जिल्हा स्टेडियम परिसरात रस्त्याचे काम दोन महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे़ या कामामुळे वाहनधारकांबरोबरच या भागातील व्यावसायिक त्रस्त झाले आहेत़ महापालिकेने कंत्राटदारांकडून सातत्यपूर्ण काम करून घ्यावे, अशी मागणी जोर धरत आहे़
जिल्हा स्टेडियम परिसरात रस्त्याच्या कामाला दोन महिन्यांपूर्वी सुरुवात झाली़ त्यापूर्वी अनेक वेळा उद्घाटनांमध्ये रखडलेल्या रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागल्याने व्यापाºयांमध्ये समाधान व्यक्त केले जात होते़ मात्र काम सुरू झाल्यानंतर हा रस्ता खोदून ठेवला असून, रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे़ दोन महिन्यांपासून काम रखडलेले आहे़ या कामाने अद्यापही गती घेतली नाही़ परिणामी परिसरातील व्यापाºयांना मोठा त्रास सहन करावा लागतोय़ रस्ता खोदून ठेवल्याने ग्राहकांवरही परिणाम झाला आहे़ दसरा, दिवाळी या दोन्ही सणांच्या काळात रस्त्याच्या कामामुळे ग्राहकांचे प्रमाण कमी राहिले़ परिणामी व्यापाºयांना आर्थिक फटका सहन करावा लागला़ मात्र रस्ता होत असल्याने व्यापारी देखील हा फटका सहन करीत आहेत़ परंतु, या कामाला गतीच मिळेना झाली़ आठ-आठ दिवस काम बंद राहते़ दोन दिवसांपूर्वी या भागातील विजेचे खांब काढून घेण्याचे काम करण्यात आले़ परंतु, त्यातील एक खांब अजूनही काढून घेतला नाही़ त्यामुळे केवळ एका खांबामुळे रस्त्याचे काम रखडले आहे़ त्यामुळे हा रस्ता वेळेत पूर्ण होण्याची शक्यता ओसरत चालली आहे़ महापालिकेने याकडे लक्ष देवून कामाची गती वाढवावी, अशी मागणी होत आहे़