नोकरासोबत मालकीण पळाली

By Admin | Updated: June 13, 2015 23:46 IST2015-06-13T23:46:07+5:302015-06-13T23:46:07+5:30

शिरुर कासार : पुणे जिल्ह्यातून पळुन आलेले विवाहित जोडपे शिरुर कासार पोलिसांनी शनिवारी पकडले. महिलेच्या नातेवाईकांनीच त्यांना शोधून काढले.

Ownership with the servant is run | नोकरासोबत मालकीण पळाली

नोकरासोबत मालकीण पळाली


शिरुर कासार : पुणे जिल्ह्यातून पळुन आलेले विवाहित जोडपे शिरुर कासार पोलिसांनी शनिवारी पकडले. महिलेच्या नातेवाईकांनीच त्यांना शोधून काढले. दरम्यान ज्या प्रियकरासोबत महिला पळाली, तो त्यांच्याकडे नोकर म्हणून कामाला होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.
पुणे येथून पळून आलेले दोघेही विवाहित आहेत. तरुणाचे वय ३५ असून त्याला पत्नी व तीन मुले आहेत तर ३० वर्षीय महिलेस पती व दोन मुले आहेत. ते दोघे पळून आल्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी येरवाडा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
ते दोघे शिरुर कासार तालुक्यातील हाजीपूर येथे गेले. तेथे वास्तव्य करुन ते शनिवारी सकाळी शिरुरकडे आले. त्यांचा माग काढत नातेवाईक शिरुरकडे आले. रस्त्यावरुन जात असताना सदरील महिलेचे नातेवाईक व ग्रामस्थ त्यांच्या मागे लागले. त्यामुळे ते दोघे पळू लागले. थोड्या अंतरावर त्या महिलेस पकडण्यात आले. त्या ठिकाणी पोलीस वेळीच पोहोचले व त्यांनी पाठलाग करुन त्या प्रियकरालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलीस उपनिरिक्षक पारवे पाटील, पोलीस जमादार अविनाश सांदळे, राजाराम तांदळे, माने हे तेथे उपस्थित होते. त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ठाण्यात नेले. चौकशी केली असता त्यांनी एकमेकांवर प्रेम असल्याची कबुली पोलिसांजवळ दिली. त्यांची प्रेमकथा ऐकून पोलिसही थक्क झाले.
तीन वर्षापूर्वी फुलले प्रेम
प्रियकर तरुण त्या महिलेच्या घरी तीन वर्षापूर्वी कामाला होता. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मुलाबाळांचा विचार न करता दोघे एकमेकांखातर आणाभाका खात पळून आले होते. (वार्ताहर)
शिरूरमध्ये सापडलेल्या पे्रमीयुगुलापैकी महिलेची हरवल्याची नोंद पुणे येथील येरवाडा ठाण्यात दाखल आहे.
४येथील पोलीस तिचा आधीपासूनच शोध घेत होते.
४ते दोघे शिरूरमध्ये एकत्रित आढळून आल्यामुळे आता त्यांना येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे, अशी माहिती उपनिरीक्षक पारवे पाटील यांनी ‘लोकमतला’ दिली.

Web Title: Ownership with the servant is run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.