चालकांचा ‘ओव्हरटाईम’ प्रवाशांच्या जीवावर!

By Admin | Updated: May 12, 2015 00:52 IST2015-05-12T00:05:23+5:302015-05-12T00:52:35+5:30

सोमनाथ खताळ , बीड राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकांना तुटपुंजे पगार आहेत. या पगारावर घर चालत नसल्याने त्यांना ‘ओव्हरटाईम’ करावा लागतो,

'Overtime' passengers on the life! | चालकांचा ‘ओव्हरटाईम’ प्रवाशांच्या जीवावर!

चालकांचा ‘ओव्हरटाईम’ प्रवाशांच्या जीवावर!


सोमनाथ खताळ , बीड
राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकांना तुटपुंजे पगार आहेत. या पगारावर घर चालत नसल्याने त्यांना ‘ओव्हरटाईम’ करावा लागतो, आणि हाच ‘ओव्हरटाईम’ शेकडो प्रवाशांच्या जीवावर बेतत असल्याचे पहावयास मिळत आहे.
ग्रामीण भागातील प्रवासी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. बसचा प्रवास हा सुखाचा असतो, असा एक विश्वास त्यांच्यामध्ये आहे. मागील काही दिवसांपासून या विश्वासाला तडा जाण्याचे काम महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. चालक-वाहकांना तुटपुंजे पगार असल्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह यामध्ये भागत नाही. म्हणून त्यांना ओव्हरटाईम करावा लागतो. कर्तव्यापेक्षा १ ते २ तासापेक्षा जास्त काम केल्यास कर्मचाऱ्यांना बेसिक पगारानुसार अतिरिक्त पैसे मिळतात. ५० ते १०० रूपये मिळविण्यासाठी आजही वाहक-चालक ओव्हरटाईम करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ड्युटी घेण्यासाठी गर्दी
ओव्हरटाईम ड्युटी घेण्यासाठी प्रत्येक आगारात चालक-वाहकांची गर्दी होताना दिसून येते. ड्युटी लावणारे त्यांच्या मर्जीतीलच लोकांना जवळ करीत असल्याचा आरोप एका चालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर केला.
सणोत्सवात अधिक त्रास
सणोउत्सव, लग्नसराईत प्रवाशांची गर्दी असते. यामध्ये चालक, वाहकांना जादा ड्यूटी करावी लागते. त्यांना आराम न मिळाल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते.
ग्रामीण भागात मुक्कामासाठी चालक-वाहक बस घेऊन गेल्यानंतर त्यांना केवळ सहा रुपये भत्ता दिला जातो. नगर पालिका व महानगरपालिकेच्या ठिकाणी भत्त्यात वाढ होऊन १५ ते २६ रूपये मिळतात. हा तुटपुंजा भत्त्यात भागत नसल्याने हा भत्ता वाढवावा, अशी मागणी चालक-वाहकांमधून होत आहे.

Web Title: 'Overtime' passengers on the life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.