अंजलीची अडचणींवर मात

By Admin | Updated: June 9, 2015 00:32 IST2015-06-09T00:32:29+5:302015-06-09T00:32:29+5:30

भूम : मोल-मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आई-वडिलांनी शिक्षणासाठी दिलेल्या प्रेरणेमुळे येथील अंजली दत्तात्रय शेवकर या मुलीने अडचणींवर मात करीत

Overcoming Anjali's Problems | अंजलीची अडचणींवर मात

अंजलीची अडचणींवर मात


भूम : मोल-मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आई-वडिलांनी शिक्षणासाठी दिलेल्या प्रेरणेमुळे येथील अंजली दत्तात्रय शेवकर या मुलीने अडचणींवर मात करीत दहावीच्या परिक्षेत ८९़६० टक्के गुण मिळविले आहेत़
भूम शहरातील दत्तात्रय शेवकर व त्यांच्या पत्नी या मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात़ त्यामुळे घरात कोणतेही शैक्षणिक वातावरण नाही़ शेवकर यांची मुलगी अंजली हिने रविंद्र हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात प्रवेश केल्यापासूनच मोलमजुरी करणाऱ्या पालकांनी मुलीने चांगले गुण मिळवावेत, अंजलीला आर्थिक अडचण जाणवू नये यासाठी प्रयत्न केले. अंजलीनेही परिस्थितीची जाणिव ठेवून वर्षभर अभ्यास केला़ त्याचेच फळ अंजलीला मिळाले. घरात शैक्षणिक वातावरण नसतानाही अंजलीने ८९़६० टक्के गुण संपादीत केले आहेत़ गणितात ९८ तर हिंदी विषयात ९४ गुण तिने मिळविले़ मुलीने ८९़६० टक्के गुण मिळविल्याचे समजल्यानंतर तिच्या पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. (वार्ताहर)

Web Title: Overcoming Anjali's Problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.