घरातून पळविला अर्ध्या लाखाचा मुद्देमाल
By Admin | Updated: April 22, 2016 00:29 IST2016-04-22T00:13:51+5:302016-04-22T00:29:33+5:30
उस्मानाबाद : शहरातील गालीबनगर भागात चोरट्यांनी घरफोडी करून आतील ५३ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ १७ एप्रिल रोजी दुपारी घडली असून,

घरातून पळविला अर्ध्या लाखाचा मुद्देमाल
उस्मानाबाद : शहरातील गालीबनगर भागात चोरट्यांनी घरफोडी करून आतील ५३ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ १७ एप्रिल रोजी दुपारी घडली असून, या प्रकरणी बुधवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील गालीबनगर भागात राहणाऱ्या निलोफर तय्यब शेख यांचे घर १७ एप्रिल रोजी दुपारी चोरट्यांनी फोडले़ चोरट्यांनी घरातील हॉलमधील पलंगावर ठेवलेल्या पर्समधील सोन्याचे मणीमंगळसूत्र, सोन्याची अंगठी, कानातले टॉप्स, गळसर, चांदीची चैन, एक माबाईल असा एकूण ५३ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ याबाबत निलोफर शेख यांच्या फिर्यादीवरून बुधवारी शहर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास हवालदार गायकवाड हे करीत आहेत़(प्रतिनिधी)