500 च्या वर कार्यकर्त्यांनी घेतला कॉंग्रेसमध्ये प्रवेश

By Admin | Updated: January 23, 2017 21:07 IST2017-01-23T21:07:19+5:302017-01-23T21:07:19+5:30

भाजपच्या खोट्या आश्वासनाला कंटाळून भाजप सहीत विविध पक्षातील 500च्या वर कार्यकर्त पदाधिकारी

Over 500 workers took part in the Congress | 500 च्या वर कार्यकर्त्यांनी घेतला कॉंग्रेसमध्ये प्रवेश

500 च्या वर कार्यकर्त्यांनी घेतला कॉंग्रेसमध्ये प्रवेश

 ऑनलाइन लोकमत
सिल्लोड, दि. 23 -  भाजपच्या खोट्या आश्वासनाला कंटाळून भाजप सहीत विविध पक्षातील 500च्या वर कार्यकर्त पदाधिकारी यांनी सिल्लोड येथे आयोजीत कार्यकर्ता मेळाव्यात कॉंग्रेस मध्ये प्रवेश घेतला.त्यात भाजपचे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक पुंडलीक मोरे, उंडनगाव येथील कृष्ना उखर्ड़े यांचा समावेश आहे. सर्व प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
दि२३ सोमवार रोजी शहरातील आंबेडकर चौक येथील नविन गांधी भवन च्या प्रांगनात हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने सिल्लोड सोयगाव तालुक्यातील भाजप,राष्ट्रवादी,शिवसेनेच्या अनेक कार्यकर्ते पदाधिकारी हजर होते.
500 कार्यकर्त्यांचा प्रवेश
सिल्लोड तालुक्यातील काही आजी माजी सरपंच, उपसरपंच, सोसायटी संचालक, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कॉंग्रेस मध्ये प्रवेश घेतला. यावेळी माजी जि. प.अध्यक्ष प्रभाकर पालोदकर,जि. प.अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी आ. कल्याण काळे,माजी आ. नितिन पाटिल,सिल्लोड चे नगराध्यक्ष अब्दुल समीर,खुलताबादचे नगराध्यक्ष कमर अहमद, फेरोज पटेल,सिल्लोड न.प. च्या उपनगराध्यक्षा शकुन्तलाबाई बंसोड़,भाऊसाहेब जगताप,जगन्नाथ खोसरे यांची प्रमुख उपस्तिथी होती.
आ.अब्दुल सत्तार म्हणाले तालुक्यातील भाजपा व इतर पदाधिकाऱ्याच्या पायाखालची वाळू सरकली असून कॉंग्रेस मध्ये कार्यकर्त्यांनी प्रवेश करू नये यासाठी अयशस्विप्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आले परंतु अनेक कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षावर विश्वास ठेऊन प्रवेश केला. प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा पक्षात मान सन्मान करण्यात येईल.सिल्लोड सोयगाव तालुक्यातील जिल्हा परिषद् व पंचायत समिती च्या कॉंग्रेस चे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी मेहनत घ्यावी असे आवाहन केले.
सत्तार साहेब ..पुन्हा जिलाध्यक्ष व्हा....
यावेळी माजी आमदार कल्याण काळे व नितिन पाटिल यांनी आ अब्दुल सत्तार यांनी जिल्हाध्यक्षांची जबाबदारी पुन्हा स्विकारावि अशी विनंती केली.
यावर आमदार अब्दुल सत्तार यांनी मी कॉंग्रेसचा सच्चा कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार आहे. दोन्ही कार्यध्यक्षांनी दिलेल्या आदेशाचे पालन होईल असे सांगितले ... यामुळे आ सत्तार पुन्हा जिल्हाध्यक्ष पद स्विकरतात का याकडे सम्पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिलाध्यक्ष पद पुन्हा स्वीकारावे का या बाबत पक्षा कडून व कार्यकर्ते आग्रह करीत आहे. मी विचार करीत आहे. योग्य वेळी निर्णय घेईन, असे आ .अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

अशोक चव्हाणच माझे नेते- सत्तार
सत्तार म्हणाले मी हटवादी माणूस नाही फ़क्त नाराजी आहे ती कॉंग्रेस पक्षाच्या भल्यासाठी व वाढीसाठी आहे न.प.च्या निवडणुकीत जर वरिष्ट नेते प्रचारास आले असते तर जे तेरा नगरसेवक केवळ दहा मताच्या फरकाने पराभूत झाले ते तेरा नगरसेवक निवडून आले असते. व एक नगराध्यक्ष वाढला असता परंतु दुर्दैव वरिष्ट नेत्यांनी त्याची दखल घेतली नाही.
अशोक चव्हाणच माझे नेते...आहे.
-आ अब्दुल सत्तार

जिल्हाध्यक्ष पद सोडल्यामुळे आमची धक धक वाढली - कल्याण काळे

यावेळी बोलतांना माजी आमदार कल्याण काळे यांनी सांगितले आमदार अब्दुल सत्तार हे मेहनती असून पक्षासाठी रात्र दिवस झटत राहतात. आ. सत्तार यांच्यामुळे जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षाला बळकटी मिळाली जिल्ह्यातील कन्नड़ खुलताबाद नगराध्यक्षपद कॉंग्रेसच्या पदरात पाडण्यासाहित सर्वात जास्त नगरसेवक निवडून आणले जे कोणाला जमत नाही ते सत्तार यांना जमते परंतु जेंवहापासून आ सत्तार यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.तेंव्हापासूनआमची धक धक वाढली आहे असे सांगून आ सत्तार यांनी पुन्हा जिल्हाध्यक्षपादि विराजमान व्हावे अशी विनंती केली.

नोटाबंदीचा निर्णय शेतकऱ्यांना वेठीस धरण्याठी  
यावेळी बोलतांना माजी जि प अध्यक्ष प्रभाकर पालोदकर यांनी राज्य व केंद्र सरकार हे बोलबच्चनाचे सरकार असून खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल या सरकाने केली आहे.सरकारने नोटाबंदिचा निर्णय शेतकऱ्यांना वेठीस धरन्यासाठी घेतला आहे
या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले.सर्वसामान्यांना बैंकेत स्व्हताचा पैसा असून देखील काढता येत नाही.

Web Title: Over 500 workers took part in the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.