शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! धावत्या रिक्षात चालकाचे विद्यार्थिनीसमोर पॅण्ट खाली करत अश्लील कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 12:38 IST

विकृताचे संतापजनक कृत्य : रात्री उशिरापर्यंत आरोपीचा शोध सुरू

छत्रपती संभाजीनगर : तुला पैसे लागतात का, असे म्हणत एका विकृत रिक्षाचालकाने विद्यार्थिनीसमोर चालत्या रिक्षात पॅण्ट काढून अश्लील कृत्य केले. शुक्रवारी सकाळी ८ वाजता पंचवटी चौकात ही संतापजनक घटना घडली.वाळूजमधील १७ वर्षीय मुलगी शहरातील नामांकित पॉलिटेक्निक महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकते. ती नियमित वाळूजवरून महावीर चौक व तेथून दुसऱ्या रिक्षाने महाविद्यालयात ये-जा करते. शुक्रवारी सिटी बसने ७:४० वाजता बाबा पेट्रोलपंपाजवळील महावीर चौकात उतरून रिक्षात बसली. तेव्हा रिक्षाचालकाने तिच्या कुटुंबाविषयी विचारणा सुरू केली. तुझा पाय दुखतो का, घरी पैशांची अडचण आहे का, मी तुला पैसे देतो, असे म्हणाला. तरुणीने त्याला रिक्षा थांबविण्यास सांगितले. मात्र, त्याने रिक्षा थांबवली नाही.

आरडाओरड करताच पळून गेलापंचवटी चौकातून जय टॉवरमार्गे रिक्षा रेल्वेस्थानकाच्या दिशेने जात असताना चालकाने अचानक पॅण्ट अर्धवट खाली करून अश्लील कृत्य केले. हे पाहून मुलगी घाबरून गेली. तिने आरडाओरड सुरू केली. चालकाने रिक्षा थांबवताच ती तत्काळ खाली उतरून रिक्षापासून दूर झाली. हे पाहून रिक्षाचालकाने वेगात पाेबारा केला. त्यानंतर तिने कुटुंबीयांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

सीसीटीव्हीवरून तपास सुरूरिक्षाचा क्रमांक एमएच २०-५६६८ असा असल्याचा अंदाज मुलीने पोलिसांकडे व्यक्त केला. चालक २२ ते ३० वर्षे वयोगटातील हिंदी भाषिक असल्याचे तिने सांगितले. वेदांतनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास सुरू केला. दोन पथक शोध घेत असून, लवकरच रिक्षाचालकाला अटक केली जाईल, असे निरीक्षक प्रवीणा यादव यांनी सांगितले.

रिक्षाचालकांवर नियंत्रण कोणाचे?शहरात यापूर्वी रिक्षाचालकांकडून प्रवासी महिलांशी अश्लील कृत्य केल्याच्या, लूटमारीच्या घटना घडल्या आहेत. अनेक गुन्हेगार आता रिक्षा व्यवसायात उतरले असून, रात्री लूटमार करतात. शहर पोलिसांकडून याबाबत गंभीर पावले उचलले जात नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

'स्मार्ट सिटी'चे कॅमेरे बंदपोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी सर्वप्रथम बाबा चौकात धाव घेतली. मात्र, तेथील स्मार्ट सिटीने कोट्यवधी रुपये खर्च करून बसवलेले अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. दुपारी ३ वाजता ते सुरू झाले. परिणामी, तपासावर परिणाम झाला. शिवाय, रेल्वेस्थानक परिसरातील बहुतांश कॅमेऱ्यांच्या दिशाच चुकलेल्या असल्याने कॅमेरे असूनही अनेकदा महत्त्वाचे चित्रण पोलिसांना मिळत नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद