शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! गतिमंद विद्यार्थ्यास हातपाय बांधून कुकरच्या झाकणाने मारहाण; ६ कर्मचारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 15:10 IST

विद्यालयातील एका गतिमंद विद्यार्थ्यास लाथाबुक्क्यांसह कुकरच्या झाकणाने दोन केअर टेकर्सनी मारहाण केेली. त्यावेळी तिथे अन्य चौघेजण हा प्रकार पाहात होते.

छत्रपती संभाजीनर : येथून जवळच असलेल्या मांडकी येथील निवासी गतिमंद विद्यालयातील गतिमंद विद्यार्थ्यास हातपाय बांधून कुकरच्या झाकणाने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोषी शिक्षक, केअर टेकर व कर्मचारी असे मिळून ६ जणांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी बाबासाहेब आरावत यांनी दिली. दरम्यान, या शाळेची मान्यताच रद्द करावी, अशी मागणी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांनी सोमवारी समाज कल्याण विभागाकडे केली आहे. 

मांडकी गावातील चैतन्य कानिफनाथ निवासी गतिमंद विद्यालयात ५० दिव्यांग विद्यार्थी असून त्यांच्यासाठी २६ शिक्षक, केअर टेकर, शिपाई कार्यरत आहेत. या विद्यालयातील एका गतिमंद विद्यार्थ्यास लाथाबुक्क्यांसह कुकरच्या झाकणाने दोन केअर टेकर्सनी मारहाण केेली. त्यावेळी तिथे अन्य चौघेजण हा प्रकार पाहात होते. त्यांनी या घटनेची ना संस्थाचालकांकडे, ना समाज कल्याण विभागाकडे वाच्यता केली. हा प्रकार दाबून ठेवण्यास तेही जबाबदार आहेत. म्हणून मारहाण करणारे व तेथे उपस्थित असलेल्या सहा जणांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे, असे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी बाबासाहेब आरावत यांनी सांगितले. दरम्यान, हे सहाही जण सध्या पसार आहेत.

 

आरोपी पसार, गुन्हा मात्र जामीनपात्रजिल्ह्यातील एका निवासी गतिमंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेतील शिपाई व काळजीवाहकानेच मारहाण केल्याच्या घटनेतील आरोपी दीपक गाेविंद इंगळे (रा. मांडकी) व प्रदीप वामन देहाडे (रा. केराळा, ता. सिल्लोड) हे पसार झाले आहेत. २६ ऑक्टोबर रोजी सखाराम पोळ (६०, रा. कैलासनगर) यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला. सदर व्हिडिओ तीन ते चार वर्षे जुना आहे. ज्या विद्यार्थ्याला मारहाण झाली, तो विद्यार्थी आता त्या शाळेत शिकत नसून तो राहत असलेला पत्ताही संस्थेकडे नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, यात दाखल गुन्हा जामीनपात्र असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

दुसऱ्या गुन्ह्यात अद्याप आरोपी निष्पन्न नाही२ मुलांना मारल्याची घटना ताजी असताना नारेगाव परिसरातही एका गतिमंद मुलाला मारण्यात आले. महिनाभरापूर्वी घडलेल्या घटनेत चौकशी करून ३० ऑक्टोबर रोजी याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गतिमंद मुलाला घटना तसेच मारणाऱ्या विषयी काहीच सांगता येत नसल्याने आरोपींना शोधणे पोलिसांसमोर आव्हान आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Outrage! Disabled student beaten; staff suspended, school recognition at risk.

Web Summary : A disabled student was brutally beaten at a residential school in Mandki. Six staff members were suspended and face charges. A demand to revoke the school's recognition has been made. Police are searching for the accused as past abuse emerges.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी