शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

गुरू-शिष्य नात्याला काळीमा! १३ वर्षीय राष्ट्रीय खो-खो खेळाडू मुलीवर प्रशिक्षकाचा अत्याचार

By सुमित डोळे | Updated: October 15, 2024 23:24 IST

राष्ट्रीय स्पर्धेसाठी मुंबईला घेऊन जाण्याच्या बहाण्याने खेळाडू मुलीस घेऊन आला छत्रपती संभाजीनगरला

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या १३ वर्षीय विद्यार्थिनीवर प्रशिक्षकानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिवाजी जगन्नाथ गोरडे ( रा. मु.पो. बालानगर, ता. पैठण) असे विकृताचे नाव असून त्याच्यावर वेदांतनगर पोलीस ठाण्यामध्ये मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या शोधासाठी पथक पैठणला रवाना झाल्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण यादव यांनी सांगितले. 

१३ वर्षीय पिडीतेच्या आईने या प्रकरणी पोलिसांकडे ठाण्यात तक्रार दाखल केली. पिडीत तरुणीची राष्ट्रीय स्तरावरील खो खो स्पर्धेसाठी निवड झाली होती. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिवाजीने  तिच्या पालकांना त्यासाठी रात्री १० वाजता रेल्वेने मुबंईला निघायचे असल्याचे सांगितले. पालकांनी त्याच्यावर विश्वास ठेवत त्याच्यासोबत मुलीला पाठवले.  दुपारी २ वाजता त्याने तिला शहरात आणत रेल्वेस्थानक परिसरातील हाँटेल पंजाब येथे जेवण्याच्या बहाण्याने नेले. परंतु थेट खोलित नेत थेट तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने प्रतिकार केला. परंतु त्याने धमकावत मुलगी रडत असतानाही तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मुलीला वेदना सुरू झाल्याने तिने पालकांना संपर्क केला. तोपर्यंत आरोपी शिवाजीने वेगवेगळे कारण सांगून पोबारा केला होता.मैत्रिणीच्या माध्यमातून संपर्क केलासुरुवातीला मुलीने घाबरून कुटुंबाला काहीच सांगितले नाही. मात्र शिवाजीने त्याचा गैरफायदा घेत तिच्या मैत्रीणीच्या माध्यमातूनसंपर्क केला. सातत्याने भेटण्यासाठी दबाव टाकून धमकावणे सुरू केले.  त्याचा त्रास वाढत चालल्याने तरुणीने कुटुंबाला हा प्रकार सांगितला. पहिले कुटुंब पैठण पोलीस ठाण्यात गेले. मात्र, तिथे त्यांना वेदांतनगर ठाण्यात जाण्यास सांगितले. मंगळवारी यादव यांनी तत्काळ यात गुन्हा दाखल केला.करिअर संपण्याची भीतीतालुका पातळीवरील एका शाळेची विद्यार्थी असताना ही १३ वर्षीय तरुणीने मोठ्या कष्टाने खो खो खेळात प्राविण्य मिळवले. पहिले स्थानिक, आंतरजिल्हा, राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवले. त्यानंतर तिची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. मात्र, अत्याचाराच्या घटनेने खेळाचे करिअर च संपण्याच्या भीतीने तरुणी तणावाखाली गेली. विशेष म्हणजे, आरोपी शिवाजी हा देखील राष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू राहिला असून विवाहित आहे.हॉटेल मालकीण, व्यवसापक ही आरोपीया गुन्ह्यात वेदांतनगर पोलिसांनी अत्याचार झालेल्या द पंजाब ग्रेट हॉटेलची मालकीण पूजा रोहित राठोड व व्यवस्थापक सादिक मिर्झा बेगला गुन्ह्यात सहआरोपी केले आहे. मुलगी नाबालिक असताना प्रवेश दिला कसा, तिचे ओळखपत्र का तपासले नाही, असे प्रश्नही उपस्थित झाले. त्यामुळे बेजबाबदार दोघांना सहआरोपी करण्यात आल्याचे निरीक्षक प्रविणा यादव यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरSexual abuseलैंगिक शोषण