औरंगाबाद येथे सखींसाठी बहारदार लावणीचा कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:15 IST2018-01-30T00:15:06+5:302018-01-30T00:15:10+5:30

सखींना ज्या कार्यक्रमाची आतुरतेने प्रतीक्षा असते, असा बहारदार लावणीचा कार्यक्रम बुधवारी (दि. ३१ जानेवारी) सखी मंचतर्फे आयोजित करण्यात आला आहे. लोकमत भवनातील लोकमत लॉनवर सायं. ५.३० वा. रंगणाºया या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ‘एकापेक्षा एक अप्सरा’ सखींच्या भेटीला येतील. सोनी मसाले हे या कार्यक्रमाचे असोसिएट स्पॉन्सर्स आहेत.

Outdoor lighting program for the students at Aurangabad | औरंगाबाद येथे सखींसाठी बहारदार लावणीचा कार्यक्रम

औरंगाबाद येथे सखींसाठी बहारदार लावणीचा कार्यक्रम

ठळक मुद्देएकापेक्षा एक अप्सरा : बुधवार, दि.३१ रोजी लोकमत लॉन येथे आयोजन

औरंगाबाद : सखींना ज्या कार्यक्रमाची आतुरतेने प्रतीक्षा असते, असा बहारदार लावणीचा कार्यक्रम बुधवारी (दि. ३१ जानेवारी) सखी मंचतर्फे आयोजित करण्यात आला आहे. लोकमत भवनातील लोकमत लॉनवर सायं. ५.३० वा. रंगणाºया या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ‘एकापेक्षा एक अप्सरा’ सखींच्या भेटीला येतील. सोनी मसाले हे या कार्यक्रमाचे असोसिएट स्पॉन्सर्स आहेत.
मराठमोळ्या लावण्याचा मनमुराद आनंद मिळवून देणारा हा एक अनोखा कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे तुमच्या मैत्रिणींसोबत या आणि कार्यक्रमाचा आनंद घ्या. केवळ सखी मंच सदस्यांसाठीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे कार्यक्रमाला येताना यावर्षीचे सखी मंच ओळखपत्र सोबत घेऊन यावे.
मनोरंजनाचा धमाका
सखी मंच महिलांसाठी नेहमीच विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करून सखींना अनुभवसंपन्न करीत असते. ‘एकापेक्षा एक अप्सरा’ हा खास महिलांनी महिलांसाठी सादर केलेला अनोखा कार्यक्रम असणार आहे. सखींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा मनोरंजनाचा धमाका अनुभवावा. - महेश सोनी, सोनी मसाले

Web Title: Outdoor lighting program for the students at Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.