आजपासून शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण
By Admin | Updated: January 15, 2016 00:14 IST2016-01-14T23:48:49+5:302016-01-15T00:14:44+5:30
बीड : जून महिन्यात शिक्षण विभागाने केलेल्या एक दिवसाच्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणातून अनेक मुले सुटली होती.

आजपासून शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण
बीड : जून महिन्यात शिक्षण विभागाने केलेल्या एक दिवसाच्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणातून अनेक मुले सुटली होती. आता सेवाभावी संस्था, एनएसएस (राष्ट्रीय सेवा योजना) व शिक्षण विभागामार्फत १५ ते ३१ जानेवारी दरम्यान संयुक्तरित्या सर्वेक्षण होत आहे.
६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य आढळलेल्या मुलांना लगेचच नजीकच्या शाळेत प्रवेश द्यायचा आहे. जी मुले आई- वडिलांसोबत स्थलांतरित झाली आहेत. त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी एजीएस अर्थात शिक्षण हक्क कार्ड दिले जाणार आहेत. आर्वी येथील शांतीवन, बीड येथील जागर प्रतिष्ठान, धारुर येथील वचनपूर्ती सेवाभावी संस्था, ब्रम्हनाथ येळंब येथील सेवाश्रम आदी सेवाभावी संस्था तसेच एनएसएस विद्यार्थी व शिक्षण विभागाचे अधिकारी १५ दिवस सर्वेक्षण करणार आहेत. शिक्षणाधिकारी (मा.) एस. पी. जैस्वाल यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून सर्वेक्षणातून एकही बालक सुटणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी तालुकानिहाय समन्वय समिती गठित केली असल्याचे जैस्वाल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)