१४०४ पैकी १३७७ गावांची मदार टँकरवर
By Admin | Updated: May 31, 2016 00:04 IST2016-05-30T23:58:22+5:302016-05-31T00:04:14+5:30
बीड : पावसाळा सुरू होण्यास जवळपास आठवडाभराचा कालावधी शिल्लक आहे. आजघडीला जिल्ह्यात १४०४ गावांपैकी १३७७ गावांची मदार टँकरवरच आहे.

१४०४ पैकी १३७७ गावांची मदार टँकरवर
बीड : पावसाळा सुरू होण्यास जवळपास आठवडाभराचा कालावधी शिल्लक आहे. आजघडीला जिल्ह्यात १४०४ गावांपैकी १३७७ गावांची मदार टँकरवरच आहे. उद्भव आटू लागल्याने दूषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
मागील तीन वर्षांत यंदा टँकरने सर्वोच्च आकडा गाठला आहे. जिल्ह्यात एकूण ९८१ बोअर, विहीर अधिग्रहित केल्या आहेत. टँकरसाठी ३६३ उद्भव अधिग्रहित आहेत, तर टँकरव्यतिरिक्त ६१८ उद्भव ग्रामस्थांना पाणी भरण्यासाठी अधिग्रहित केले आहेत. पुढील आठवडाभरात पावसाचे आगमन अपेक्षित आहे. पाऊस पडल्यानंतरही किमान पंधरा दिवस ते महिनाभराचा कालावधी गेल्यानंतर टँकरची संख्या कमी होऊ शकेल. अशा टंचाईग्रस्त परिस्थितीत हंडाभर पाण्यासाठी महिलांना मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. बच्चे कंपनीच्या उन्हाळी सुट्या पाणी भरण्यात जात आहेत.
शहरी भागात १ हजार लिटर पाण्यासाठी ३०० रुपये मोजावे लागत आहेत. १५ मेपर्यंत बीड शहरात १० दिवसाला पाणीपुरवठा केला जात होता; मात्र माजलगाव बॅकवॉटरमधील पाणी कमी झाल्याने आता तो १५ दिवसांनी होत आहे. परिणामी बीड शहरात देखील आता टँकरची मागणी वाढली आहे. (प्रतिनिधी)