‘आमचं गाव आमचा विकास’ अर्ध्यावरच...!
By Admin | Updated: November 19, 2016 00:56 IST2016-11-19T00:58:02+5:302016-11-19T00:56:47+5:30
जालना : चौदाव्या वित्त आयोगातून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ग्रामपंचायतीला देण्यात आलेला कोट्यवधी रूपये कोठे खर्च करणार याचा संपूर्ण आराखडा आॅनलाईन पाठवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

‘आमचं गाव आमचा विकास’ अर्ध्यावरच...!
जालना : चौदाव्या वित्त आयोगातून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ग्रामपंचायतीला देण्यात आलेला कोट्यवधी रूपये कोठे खर्च करणार याचा संपूर्ण आराखडा आॅनलाईन पाठवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी फ्लॅन्टप्लस हे नवीन सॉफटवेअर तयार केले आहे. परंतु अद्याप सॉप्टवेअर अद्ययावत झाले नसल्याने आराखडा पाठविण्याचे काम रखडल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘आमचं गाव आमचा विकास’ या उपक्रमासंदर्भात जिल्ह्यातील ७७९ ग्रामपंचायतींनी चौदाव्या वित्त आयोगातून देण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील लाखो रूपये कोणत्या कामांवर खर्च करणार, याचा अद्ययावत आराखडा शासनाला पाठविण्याच्या सूचना ग्रामीण विकास मंत्रालयाकडून संबंधित जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाला देण्यात आलेल्या आहेत. २०१६ मध्ये प्राप्त झालेल्या निधीतून पहिल्या वर्षाचा आराखडा जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी तयार केला आहे. तरी काही ग्रामपंचायतींचे आराखड्याचे काम सुरू असल्याचे पंचायत विभागाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश इंगळे यांनी सांगितले. काही तालुक्यांचे आराखडे पाठविण्याच्या तयारीत असताना ग्राम विकास मंत्रालयाच्या वतीने फ्लॅन्टप्लस नवीन सॉप्टवेअरमध्ये आराखडे पाठविण्याच्या सूचना दीड महिन्यांपूर्वीच आल्या आहेत. परंतु अद्याप सॉप्टवेअर अद्ययावत नसल्याने आराखडा पाठविण्यास अडचणी येत असल्याचे इंगळे म्हणाले. ग्रामसेवकांचे आंदोलन सुरू असल्याने यावर परिणाम झाला आहे. ग्रामसेवकांचे आंदोलन संपल्यास पुन्हा त्याकडून त्या-त्या तालुक्याच्या बीडीओमार्फत कामे करून घेण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)