शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

Aurangabad Violence : आमची घरे जळताहेत, लवकर या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 10:39 IST

दुकाने, घरे, वाहनांना लागलेली आग विझविण्यासाठी फायरब्रिगेडकडे मदतीसाठी केलेल्या फोनवर अनेक महिला अक्षरश: रडल्या. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर रात्री १ वाजून १० मिनिटांनी फायरब्रिगेडला पहिला मदतीसाठी फोन आला. त्यानंतर आग लागली आहे, लवकर... अशी आर्त हाक देणारे फोन येत राहिले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दुकाने, घरे, वाहनांना लागलेली आग विझविण्यासाठी फायरब्रिगेडकडे मदतीसाठी केलेल्या फोनवर अनेक महिला अक्षरश: रडल्या. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर रात्री १ वाजून १० मिनिटांनी फायरब्रिगेडला पहिला मदतीसाठी फोन आला. त्यानंतर आग लागली आहे, लवकर... अशी आर्त हाक देणारे फोन येत राहिले, तसे फायरब्रिगेडचे बंब घटनास्थळी गेले. दोन्हीकडील जमाव, बंबमध्ये संपलेले पाणी, एन-५ ते घटनास्थळी टँकर पोहोचेपर्यंतचा वेळ आणि पोलिसांनी घटनास्थळाची परिस्थिती पाहून केलेली अडवणूक यामुळे सर्व काही उपलब्ध असताना काहीही करता आले नाही. फायरब्रिगेडमधील काही जवानांना हा सगळा अनुभव सांगताना भावना अनावर झाल्या होत्या.अग्निशमन विभागाने सांगितले, राजाबाजार, मोतीकारंजा, शहागंज, नवाबपुरा, गांधीनगर परिसरात शुक्रवारी रात्री ते शनिवारी पहाटेपर्यंत आग विझविण्यासाठी फायर ब्रिगेडला मदतीची अनेकांनी हाक दिली. त्यांनीही प्रत्येक ठिकाणी वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न केला. समोरच्या बाजूने आग लागली असेल ती आटोक्यात येईपर्यंत दुसऱ्या ठिकाणी आग लावल्याचा फोन येत होता. ती विझविण्यासाठी जाताच तिस-या ठिकाणी आग लावल्याचे फोन येत. त्यामुळे व्हिडिओकॉन, बजाज, गरवारे, एमआयडीसीतील फायरबंबांना पाचारण करण्यात आले.वाळूज एमआयडीसीचा बंब दंगलखोरांनी फोडला. त्यात कर्मचा-यांनाही मार लागला. अग्निशमन दलाचे ५ जवान दंगलीत जखमी झाले आहेत. काही जणांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. वाहनावर देशी दारूच्या भरलेल्या बाटल्या भिरकावून आग लावण्याचा प्रयत्न झाला. चेलीपुरा, नवाबपु-यातील रंगाची दुकानातील आग विझविण्यासाठी फायरब्रिगेडला जाऊच दिले नाही. गुलमंडीच्या अलीकडेच अग्निशमन विभागाची वाहने रोखण्यात आली. शहागंजमधील चप्पल मार्केटपर्यंत फायरबंबाला जाऊ दिले नाही.

टॅग्स :fireआगSocialसामाजिकAurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचार