शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी आमची मागणी कायम: अतुल सावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 19:52 IST

जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये स्पर्धा; भाजप, शिंदेसेनेचा दावा

छत्रपती संभाजीनगर : फडणवीस सरकारचे खातेवाटप झाल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी भाजप आणि शिंदेसेनेत स्पर्धा लागली आहे. आम्हाला पालकमंत्रिपद मिळावे, ही मागणी कायम असल्याचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी रविवारी सांगितले. दरम्यान, शनिवारी समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी मीच पालकमंत्री होणार, असे स्पष्ट केले.

मंत्री सावे म्हणाले, जी खाते मिळाले आहेत, त्यावर मी १०० टक्के समाधानी आहे. तीन खाते माझ्याकडे आहेत. सोलार एनर्जीमध्ये काम करण्यास खूप वाव आहे. या खात्याचे बजेट खूप मोठे आहे. तिन्ही खाते उत्तम आहेत. ओबीसी कल्याण खात्यामध्ये काम करताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. दुग्धविकास आणि सोलर एनर्जी खात्यामध्ये चांगले काम करेन. प्रत्येक घरावर सोलार एनर्जीतून वीज मिळावी, हे पंतप्रधान मोदी यांचे धोरण आहे. ते धोरण राज्यात पूर्ण ताकदीने राबविणार, असे सावे यांनी स्पष्ट केले.

आमची मागणी कायमपालकमंत्रिपदाची मागणी केलीच आहे. नेते जे पालकमंत्री ठरवतील, त्यांना पद मिळेल. परंतु, आमची मागणी कायम आहे. शिरसाट झाले, तर आनंदच असेल, आम्हाला दु:ख होणार नाही. आम्हाला इतर दुसरा जिल्हा मिळेल.- अतुल सावे, ओबीसी कल्याण मंत्री

मुंबईत शिष्टमंडळ भेटणार..पालकमंत्रिपद कुणाला द्यायचे, याचा निर्णय मुंबईत होणार आहे. खातेवाटप जाहीर झाल्यानंतर लगेचच पालकमंत्री जाहीर होणार नाहीत. दोन-चार दिवसांत बैठक होणार असून, भाजपचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून पदाची मागणी करणार आहे.- शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष भाजप

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAtul Saveअतुल सावेBJPभाजपा