शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

...अन्यथा मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरणार: अंबादास दानवे

By बापू सोळुंके | Updated: August 18, 2023 18:38 IST

विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवेंचा शासनाला इशारा

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याने पळविले आहे. नांदूर,मधमेश्वरसाठी बांधलेल्या चार धरणातून ३०० द.ल.घ.मी.पाणी बंधनकारक असताना या पाण्यावर पिण्याच्यावर आरक्षण टाकण्यात आले आहे. हक्काचे पाणी मिळावे,अशी मराठवाड्याच्या जनतेची मागणी आहे. यासाठी विरोधीपक्षनेते म्हणून शासनास विनंती करू, ही विनंती मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरू,असा इशारा विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी शासनाला दिला.

आ.दानवे यांनी गोदावरी  मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, जलसंपदा विभागाच्या अन्य अधिकाऱ्यांची शुक्रवारी सिंचन भवन येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, यावर्षी मुबलक पाऊस न पडल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात केवळ ३४ टक्के जलसाठा आहे.गतवर्षी आजच्या दिवशी ८७ टक्के जलसाठा होता. अन्य धरणांतही अल्पजलसाठा आहे. यापार्श्वभूमीवर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील मंजूर लहान,मोठी आणि मध्यम धरणांची काय परिस्थिती आहे, किती प्रकल्प निधी अभावी रखडले आहेत, किती प्रकल्पांची कामे यावर्षी पूर्ण होतील.तसेच दोन्ही जिल्ह्यातील भूसंपादनाची प्रलंबित प्रकरणांबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्याचे दानवे म्हणाले. नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्याला पाणी देण्याचे प्रस्तावित आहे,याविषयी माहिती घेतली.दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या विविध धरणांत वळविण्यात आले आहे. मराठवाड्याला हक्काचे पाणी द्यावे,यासाठी शासनाला विनंती करणार आहे, यानंतरही त्यांनी न ऐकल्यास रस्त्यावर उतरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.  

नांदूर मधमेश्वरच्या हक्काचे ३०० दलघमी पाण्यावरही डल्ला कायम कमी पावसाची तालुके म्हणून   गंगापूर आणि वैजापूर तालुक्यांची ओळख आहे. या तालुक्यांसाठी नांदूर- मधमेश्वर प्रकल्प बांधण्यात आला आहे. या प्रकल्पात पाणी सोडण्यासाठी नाशिक जिल्ह्यात चार लहान मोठी धरणे बांधलली आहेत. या धरणांची एकूण साठवणक्षमता ३८३ द.ल.घ.मी. आहे. यातील ३०० दलघमी. पाणी नांदूर मधमेश्वर प्रकल्पासाठी राखीव आहे.असे असताना नाशिक शहर, सिन्नर आणि अन्य गावांसाठी पिण्याचे पाणी घेण्यात आल्याने प्रत्यक्षात नांदूर मधमेश्वरला केवळ १२०दलघमी पाणी मिळते. यातही उन्हाळ्यात ५ ते ५० टक्के पाण्याचा वहन तोटा होतो. 

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाRainपाऊसAurangabadऔरंगाबाद