अन्यथा संघर्षाची भूमिका घेऊ
By Admin | Updated: October 13, 2016 01:01 IST2016-10-13T00:31:01+5:302016-10-13T01:01:59+5:30
औरंगाबाद : शासनाने जारी केलेला २७ नोव्हेंबर २०१५ रोजीचा निर्णय मागे घेतला पाहिजे. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमातील शिक्षकांवर अन्याय आता सहन केला जाणार नाही.

अन्यथा संघर्षाची भूमिका घेऊ
औरंगाबाद : शासनाने जारी केलेला २७ नोव्हेंबर २०१५ रोजीचा निर्णय मागे घेतला पाहिजे. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमातील शिक्षकांवर अन्याय आता सहन केला जाणार नाही. शासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा आम्हाला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा महाराष्ट्र व्होकेशनल टीचर्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष डॉ. युगल रायलू यांनी दिला.
सिंचन भवनमध्ये महाराष्ट्र व्होकेशनल टीचर्स असोसिएशनच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. रायलू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संघटना वाढीसंबंधी चर्चा झाली. जिल्हानिहाय संघटनेचे जाळे निर्माण करण्याची जबाबदारी राज्य कार्यकारिणी सदस्यांवर सोपविण्यात आली. त्यानंतर व्होकेशनल टीचर्सबाबत सरकारच्या उदासीन धोरणावर बराच खल झाला. शासनाने २७ नोव्हेंबर २०१५ रोजी जारी केलेल्या निर्णयाद्वारे पुनर्रचित अभ्यासक्रम लागू केला. मात्र या निर्णयात अनेक त्रुटी आहेत. त्या दूर केल्या पाहिजेत. या निर्णयातील त्रुटी या विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या आहेत. पूर्वीप्रमाणे व्यवसाय अभ्यासक्रमासाठी २० अधिक ५ अशी विद्यार्थी संख्या ठेवली जावी, तासिका तत्त्वावरील शिक्षकांना आताही केवळ ६५ रुपये प्रती तास मानधन दिले जाते. ते अत्यंत तुटपुंजे आहे. सध्याच्या महागाईनुसार ५०० रुपये प्रती तास मानधन करण्यात यावे, या इतर अनेक प्रश्नांवर चर्चा झाली.
मराठवाडा व्होकेशनल टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मनोहर वानखडे यांनी या विभागातील संघटनेच्या कार्याची माहिती दिली, तसेच विविध ठरावांचे वाचन केले. व्यासपीठावर संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. रायलू, मराठवाडा अध्यक्ष डॉ. वानखडे, प्रा. संदीप रेवतकर, प्रा. जयंत भाभे, प्रा. प्रकाश तराळे, प्रा. प्रकाश हमणे, प्रा. संजय विसपुते, प्रा. वर्षा ढवळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रामदास गायकवाड यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. भालचंद्र येडवे यांनी मानले. राज्यस्तरीय बैठकीच्या यशस्वीतेसाठी प्रा. विजय पाटील, प्रा. राजपूत, प्रा. महम्मद एजाज, प्रा. राजेश नागे आदींनी परिश्रम घेतले.