शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मेहदीला पळविण्याचा कट;आणखी दोघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:37 IST

सुपारी किलर इम्रान मेहदी याला पळवून नेण्याच्या कटातील आणखी दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हर्सूल ते कडेठाण रस्त्यावर पकडले. आरोपींकडून एक पिस्टल आणि १० काडतुसे जप्त केली. अटकेतील आरोपींपैकी एक उत्तर प्रदेशातील रहिवासी असून, त्याच्याविरोधात खुनाचे दोन गुन्हे नोंद आहेत. दुसरा रिक्षाचालक असून, तो सतत आरोपींच्या संपर्कात असतो.

ठळक मुद्देपिस्तुलासह १० काडतुसे जप्त : हर्सूल ते कडेठाण रस्त्यावर कारवाई; अटकेतील एकजण उत्तर प्रदेशचा रहिवाशी; दुसरा रिक्षाचालक

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सुपारी किलर इम्रान मेहदी याला पळवून नेण्याच्या कटातील आणखी दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हर्सूल ते कडेठाण रस्त्यावर पकडले. आरोपींकडून एक पिस्टल आणि १० काडतुसे जप्त केली. अटकेतील आरोपींपैकी एक उत्तर प्रदेशातील रहिवासी असून, त्याच्याविरोधात खुनाचे दोन गुन्हे नोंद आहेत. दुसरा रिक्षाचालक असून, तो सतत आरोपींच्या संपर्कात असतो.विजयकुमार ऊर्फ आफताब रामप्रसाद चौधरी (३६, रा. बालकेश्वरी, ता. करावली, जि. आग्रा, उत्तर प्रदेश) आणि अबू चाऊस ऊर्फ मुसा सालेह चाऊस (२६, रा. सईदा कॉलनी, जटवाडा रस्ता) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांवर गोळीबार करून इम्रान मेहदीला पळवून नेण्यासाठी मध्यप्रदेशातून आलेल्या शार्पशूटरच्या टोळीसह ११ जणांना २७ आॅगस्ट रोजी सकाळी गुन्हे शाखेने अटक केली. त्यावेळी त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल आणि आठ काडतुसे जप्त केली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. इम्रानला सोडण्यासाठी आलेल्या त्याच्या हस्तकांकडे दोन पिस्टलसह अन्य शस्त्रे असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली होती. यात मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, मुंबई आणि बीड येथील काही जणांचा समावेश असल्याची पक्की खबर होती. काही जण हर्सूल परिसरात रूम भाड्याने घेऊन राहत असल्याची माहिती बुधवारी रात्री निरीक्षक मधुकर सावंत यांना मिळाली. त्यानंतर सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सावंत, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक अनिल वाघ, उपनिरीक्षक अमोल देशमुख, कर्मचारी शिवाजी झिने, सुनील धात्रक, राजेंद्र साळुंके, भगवान शिलोटे, संतोष सूर्यवंशी, शेख नवाब, वीरेश बने, शिवाजी भोसले, संजय जाधव, भरत बहुरे आणि शेख सुलताना यांनी हर्सूल परिसरात आरोपींचा शोध सुरू केला. हर्सूल भागातील कोलठाणवाडी रस्त्यावर रात्री पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. तेव्हा दोन्ही संशयित पोलिसांना दिसले. त्यावेळी पुढे जाऊन पोलिसांनी त्यांचे वाहन वळवून आणले आणि अचानक आरोपींजवळ गाडी उभी करून त्यांना चोहोबाजूने घेरून पकडले.आफताबने पोलिसांवर पिस्टल रोखण्याचा केला प्रयत्नयावेळी आफताबला पोलिसांनी पकडताच त्याने कमरेत खोसलेले पिस्टल काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा प्रयत्न हाणून पाडला आणि त्याच्या हातातील पिस्टल हिसकावून घेतला. त्या पिस्टलमध्ये सहा गोळ्या होत्या. तर आरोपी मुसाच्या खिशात चार काडतुसे मिळाली.आफताब ऊर्फ विजयकुमार चौधरी याने वयाच्या अठराव्या वर्षी आग्रा येथे पहिला खून केला. त्यानंतर तो मुंबईला आला. तेथेही त्याने साथीदाराच्या मदतीने एकाची हत्या केली होती. याप्रकरणी न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. ही शिक्षा भोगत असताना तो नाशिक कारागृहात आणि नंतर औरंगाबादेतील हर्सूल कारागृहात होता. हर्सूल कारागृहात असताना त्याची ओळख आरोपी इम्रान मेहदी आणि सरूफ खानसह अन्य आरोपींसोबत झाली होती. तब्बल साडेसोळा वर्षांनंतर आफताब १९ जुलै रोजी कारागृहातून बाहेर आला. त्याच्या सुटकेसाठी इम्रानने त्याला मदत केल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवाय कारागृहातून सुटल्यानंतर त्याला गावी जाण्यासाठी पैसेही मेहदीने दिले होते, असे सूत्रांनी सांगितले.इम्रानला सोडविण्यासाठीआफताब आला आग्य्राहूनआफताब हा इम्रानचा चांगला मित्र झाला होता. इम्रानला सोडवायचे आहे. २७ रोजी त्याला न्यायालयात आणले जाणार आहे. त्याला सोडविण्यासाठी जास्त माणसांची गरज असल्याने तू लगेच ये, असा निरोप त्याला देण्यात आला. २५आॅगस्ट रोजी तो आग्य्राहून रेल्वेने निघाला आणि २६ रोजी दुपारी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर उतरला. त्यावेळी त्याला घेण्यासाठी रेल्वेस्टेशनवर रिक्षाचालक अबू चाऊस ऊर्फ मुसा हा हजर होता. २६ पासून कालरात्री अटक होईपर्यंत आफताबची सर्व व्यवस्था अबू चाऊस पाहत होता. त्याला खर्चासाठी पैसेही त्यानेच पुरविल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक