स्वस्त धान्य दुकानातून धान्य वाटपा सोबतच इतर सेवा

By Admin | Updated: March 10, 2017 00:22 IST2017-03-10T00:19:11+5:302017-03-10T00:22:37+5:30

जालना : जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानातून स्वस्तधान्यासोबतच इतर सेवाही मिळणार आहेत.

Other services along with allocation of food grains through cheapest grains | स्वस्त धान्य दुकानातून धान्य वाटपा सोबतच इतर सेवा

स्वस्त धान्य दुकानातून धान्य वाटपा सोबतच इतर सेवा

जालना : जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानातून स्वस्तधान्यासोबतच इतर सेवाही मिळणार आहेत.
स्वस्तधान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन दुकानदार यांची बॅकेचे व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून नियुक्तीबाबतची कार्यशाळा व बैठक गुरुवारी फुलंब्रीकर नाट्यगृहात जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी जिल्हा अग्रणी बॅक अधिकारी, राष्ट्रीयीकृत बॅकेचे प्रतिनिधी, कृषी विभागाचे मोहीम अधिकारी व माईक्रो एटीएम सेवा पुरवणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी जालना व जिल्हयातील सर्व नायब तहसलीदार पुरवठा व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
पुरवठा अधिकारी नंदकर यांनी उपस्थित सर्व बॅकेचे अधिकारी व इतर अधिकारी यांचे स्वागत केले. कार्यशाळा दोन टप्प्यात झाली. प्रथम टप्यात परतूर, मंठा, अंबड व घनसावंगी तालुक्यातील रास्त भाव दुकानदार व किरकोळ केरोसीन दुकानदार यांना मार्गदर्शन करण्यात आले व दुसऱ्या टप्यात जालना, बदनापुर, भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील रास्त भाव दुकानदार व किरकोळ केरोसीन दुकानदार यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत रास्तभाव व किरकोळ केरोसीन दुकानदार यांना बॅकेचे व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून नेमण्यात येणार असल्याच्या सूचना प्राप्त झाल्यााबाबत कळविण्यात आले. सदर प्रतिनिधी नेमण्यासाठी शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असून सदर समितीत जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक हे निमंत्रक असल्याचे नंदकर यांनी सांगितले.
स्वस्त धान्य दुकानदारांना बँक प्रतिनिधी म्हणून काम करताना किमान कमीत कमी २० दिवस सेवा देणे आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यशाळेत बँक प्रतिनिधी म्हणून नेमणूक होण्यासाठी पात्रता व लागणारी कागदपत्रे याबाबत मार्गदर्शन करताना व्यावसायिक प्रतिनिधींनी करावयाची कामे, त्यांना मिळणारे फायदे व कमिशन बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले.
रास्तभाव दुकानातून प्रमाणित बी-बियाणे विक्री करणे याबाबत माहिती देण्यात आली. यासाठी इच्छुक दुकानदारांनी कृषी विभागाकडून प्रमाणित बी-बियाणे विक्रीचा परवाना प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. सदर परवान्यानुसार केवळ कृषी विभागाकडून प्रमाणित बी-बियाणांची विक्री रास्तभाव दुकानदारांना करता येईल, असे स्पष्ट केले. तसेच रास्तभाव दुकानांमध्ये कोणत्याही परिस्थितीत रासायनिक खते, जंतुनाशके व इतर रसायने इ. वस्तू ठेवता येणार नसल्याचे स्पष्ट केले. यासाठी स्वस्त धान्य दुकानदार यांना ई परवाना या संकेत स्थळावर अर्ज करुन कागदपत्रे जोडल्यानंतर सदर अर्जांची छाननी करण्यात येवून क्षेत्रीय अधिकारी स्थळपाहणी व प्रत्यक्ष भेट दिल्या नंतर ठराविक शुल्क भरून बियाणे विक्री परवाना संबधिताना कृषी विभाग जिल्हा परिषद जालना यांचे मार्फत देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे नंदकर यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील रास्तभाव दुकानदारांना सेवा नवी दिल्ली या कंपनीकडून उपलब्ध करुन देण्यास शासनाकडून परवानगी देण्यात आल्याबाबत सूचित करण्यात आले. यासाठी जिल्ह्यातील रास्तभाव दुकानदारांसोबत करार करणार असल्याबाबत तसेच सदर कंपनीने त्यांच्या खर्चाने रास्तभाव दुकानदार यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. तसेच ज्या रास्तभाव दुकानदारांकडे त्यांचा स्वत:चा लॅपटॉप व १५० स्क्वेअर फुट अतिरिक्त जागा उपलब्ध आहे त्यांना अतिरिक्त सेवा जसे विविध बिलांचा भरणा करणे, रेल्वे, विमान तिकीट इत्यादी सेवा पुरविण्यात परवानगी देण्यात येईल असे नंदकर यांनी रास्तभाव दुकानदार यांना सूचित केले.
सदर कार्यशाळेत सर्व रास्त भाव दुकानदारांना मशीनची ओळख करुन देताना सदर मशीनची वैशिष्ट्य, फायदे सांगण्यात आले.मशीनद्वारे धान्य वाटप करण्यापूवीर्ची तयारी तसेच बायोमॅट्रिक धान्य वितरणाकरिता लाभार्थ्यांचे प्रणालीमध्ये आधार क्रमांकाची नोंदणी असणे आवश्यक असल्याचे सांगितले. सर्व रास्तभाव दुकानदारांना पॉसमशीनद्वारे मशीनद्वारे धान्य वितरणाचे प्रशिक्षण देण्यात आले.

Web Title: Other services along with allocation of food grains through cheapest grains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.