उभी खाजगी ट्रॅव्हल्स बस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2017 00:47 IST2017-06-11T00:45:13+5:302017-06-11T00:47:29+5:30
औरंगाबाद : तीन वर्षांपासून एकाच ठिकाणी उभी असलेली खाजगी ट्रॅव्हल्स बस शनिवारी दुपारी अचानक जळून खाक झाली.

उभी खाजगी ट्रॅव्हल्स बस जळून खाक
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : तीन वर्षांपासून एकाच ठिकाणी उभी असलेली खाजगी ट्रॅव्हल्स बस शनिवारी दुपारी अचानक जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. ही घटना चुन्नीलाल पेट्रोलपंप ते एसएससी बोर्ड या रस्त्यावर घडली.
खाजगी ट्रॅव्हल्सची बस (क्र.एमएच-२० डब्ल्यू ९९२०) दोन-तीन वर्षांपासून एकाच ठिकाणी उभी होती. शहरात ट्रॅव्हल्सना प्रवेशबंदी करण्यापूर्वी या पेट्रोललपंप परिसरात अनेक खाजगी ट्रॅव्हल्स बसेस उभ्या राहत. त्यापैकीच ही एक बस होती. शनिवारी दुपारी ३.२० च्या सुमारास या बसला आग लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. उपअग्निशमन अधिकारी विनायक लिपणे, लक्ष्मण कोल्हे, मोहन मुंगसे, वाहनचालक सुभाष दुधे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करून आग विझविली. परंतु संपूर्ण बस जळून खाक झाली. या बसला आग कशी लागली, याची काहीही माहिती पोलीस अथवा अग्निशमन दलाला सांगता आली नाही.