उस्मानाबाद, कळंबमध्ये तणाव

By Admin | Updated: June 1, 2014 00:26 IST2014-05-31T23:59:05+5:302014-06-01T00:26:57+5:30

उस्मानाबाद : फेसबूकवर महापुरूषाचे आक्षेपार्ह छायाचित्र टाकल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शनिवारी रात्रीच्या सुमारास उस्मानाबाद शहरासह जिल्हाभरात तीव्र निषेध करण्यात आला़

Osmanabad, Kambham tension | उस्मानाबाद, कळंबमध्ये तणाव

उस्मानाबाद, कळंबमध्ये तणाव

उस्मानाबाद : फेसबूकवर महापुरूषाचे आक्षेपार्ह छायाचित्र टाकल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शनिवारी रात्रीच्या सुमारास उस्मानाबाद शहरासह जिल्हाभरात तीव्र निषेध करण्यात आला़ कळंब शहरात रास्तारोको करण्यात आला़ तर काहीनी बसवर दगडफेक केली़ तुळजापुरात रविवारी बंदची हाक देण्यात आली आहे़ उस्मानाबाद शहरात काही युवकांनी शहर पोलिस ठाण्यात निवेदन सादर केले़ तर जिल्हाधिकारी कार्यालयातही निवेदन देण्यासाठी मोठा जमाव झाला होता़ काही युवकांनी दुचाकीवरून फिरून घोषणाबाजी केल्याने अनेकांनी आपाली दुकाने बंद केली़ तर न्यायालयाजवळ एका दुकानावर दगड फेकल्याचे वृत्त आहे़ पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली़ तुळजापूर शहरातही शेकडो युवकांनी या घटनेचा निषेध करीत पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले़ तसेच रविवारी तुळजापूर बंदची हाक देण्यात आली आहे़ उमरगा शहरातील माऊली प्रतिष्ठाणच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे़ निवेदनावर उमाकांत माने, सिध्देश्वर दूधभाते, ईश्वर चंदनशिवे आदीची स्वाक्षरी आहे़ कळंब येथे शिवप्रेमी युवकांनी सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास शिवाजी चौकात तासभर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान जमावाने कळंब-उस्मानाबाद (क्र. एमएच १४/ बीटी १९४७), परभणी-कोल्हापूर (एमएच २०/ बीएल २१५८) आणि कळंब-घोडकी (एमएच २०/ डी ८३५८) या बसगाड्यांवर दगडफेक करून नुकसान केले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अजीत पिंगळे, युवा नेते शिवाजी शेंडगे, आदी उपस्थित होते. यावेळी सागर बाराते, संदीप मडके, गोपाळ चोंदे, बळीराजे चव्हाण, शिवाजी शेंडगे आदींनी याप्रकरणी कारवाईच्या मागणीचे निवेदन पोलिस प्रशासनाला सादर केले.

Web Title: Osmanabad, Kambham tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.