उस्मानाबदमध्ये सेना-भाजपा नेत्यांचा राडा
By Admin | Updated: November 22, 2014 13:39 IST2014-11-22T13:38:23+5:302014-11-22T13:39:04+5:30
उस्मानाबाद येथे शिवसेनेचे रवी गायकवाड व भाजपाचे संजय निंबाळकर यांच्या दरम्यान जोरदार बाचाबाची झाल्याने कार्यकर्त्यांदरम्यानही राडा झाला

उस्मानाबदमध्ये सेना-भाजपा नेत्यांचा राडा
ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. २२ - उस्मानाबाद येथे शिवसेनेचे रवी गायकवाड व भाजपाचे संजय निंबाळकर यांच्या दरम्यान जोरदार बाचाबाची झाल्याने कार्यकर्त्यांदरम्यानही राडा झाला. एवढचं नव्हे तर भाजपा कार्यकर्त्यांनी गायकवाड यांना महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा सत्कारही करू दिला नाही.
सध्या मराठवाड्याच्या दौ-यावर असलेले एकनाथ खडसे उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या घरी गेले असता खडसे यांचा सत्कार करण्यासाठी गायकवाड तेथे आले. मात्र भाजपा नेते संजय निंबाळकर यांनी त्यास आक्षेप नोंदवत. लोकसभा निवडणुकीदरम्यान सेने भाजपाचा प्रचार केला नाही, असे सांगत गायकवाड यांना खडसेंचा सत्कार करू दिला नाही. या सर्व प्रकारानंतर गायकवाड व भाजपा नेत्यांदरम्यान बाचाबाची व धक्काबुक्कीही झाली.