शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी बाजार समितीवर सर्वपक्षीय पॅनलचे वर्चस्व

By admin | Updated: August 18, 2015 00:50 IST

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक मतमोजणी सोमवारी पार पडली. यात ११ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक मतमोजणी सोमवारी पार पडली. यात ११ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वच ११ ही जागेवर सर्वपक्षीय पुरस्कृत खंडेश्वर शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली असून, या अगोदर १८ संचालकापैकी ७ उमेदवार बिनविरोध आल्याने खंडेश्वर पॅनलने सर्व १८ जागांवर वर्चस्व मिळविले.परिसरातील तब्बल ५० गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या आष्टी बाजार समितीत झालेल्या निवडणुकीत अपक्ष विरूद्ध सर्वपक्षीयामध्ये दोन्ही काँग्रेस, भाजपा-शिवसेना एकत्र आले होते. रविवारी ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. यासाठी २० उमेदवार निवडणूक रिंंगणात होते. सोमवारी निकाल जाहीर करण्यात आला. यात सूर्यकांत बरकुले, सुरेश खरात, दिगंबर राऊत, सुखलाल राठोड, सिद्धेश्वर सोळंके, सुरेश सोळंके, निळकंठ तौर, अशोक कांबळे, निर्मला ढवळे, पार्वती कणसे, संभाजी मोरे विजयी झाले. तर शांताबाई करपे, मंदाबाई नळगे, अर्जुन राठोड, रामप्रसाद थोरात, शांताराम शिंदे, रंगनाथ येवले, राजेंद्र बाहेती हे सात उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते.विजयी उमेदवारांचा बाजार समितीमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी राहुल लोणीकर, बळीराम कडपे, विलासराव आकात, मदन सिंगी, कुणाल आकात, राजेभाऊ तौर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी.आर. नलावार, पी.व्ही. गावंडे, एस.डी. देवरे, शरद तनपुरे, कैलास मुजमुले, किरण नंदापूरकर आदींनी काम पाहिले. (वार्ताहर)