आर्थोपेडिक डॉक्टर होणार माफीचे साक्षीदार !

By Admin | Updated: April 16, 2017 23:11 IST2017-04-16T23:10:42+5:302017-04-16T23:11:46+5:30

लातूर : विना परवाना एजन्सीकडून आर्थोपेडिक एम्प्लांट (हाडांची जोडणी करणारे साहित्य) ची खरेदी केल्याप्रकरणी शहरातील ३२ आर्थोपेडिक डॉक्टरांना अन्न व औषध प्रशासन विभागाने नोटिसा बजावल्या होत्या़

An orthopedic doctor will be an apology witness! | आर्थोपेडिक डॉक्टर होणार माफीचे साक्षीदार !

आर्थोपेडिक डॉक्टर होणार माफीचे साक्षीदार !

लातूर : विना परवाना एजन्सीकडून आर्थोपेडिक एम्प्लांट (हाडांची जोडणी करणारे साहित्य) ची खरेदी केल्याप्रकरणी शहरातील ३२ आर्थोपेडिक डॉक्टरांना अन्न व औषध प्रशासन विभागाने नोटिसा बजावल्या होत्या़ या डॉक्टरांनी खुलासे सादर केल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने त्यांच्यापुढे गुडघेच टेकले आहेत़ या डॉक्टरांवर कारवाई करण्याऐवजी त्यांनाच माफीचे साक्षीदार करण्याच्या हालचाली सुरू आहेत़
शरिरातील कुठलाही भाग तुटल्यानंतर त्याला पुन्हा जोडणी करण्यासाठी शस्त्रक्रियेदरम्यान आर्थोपेडिक एम्प्लांटचा उपयोग केला जातो़ या साहित्याचा विनापरवाना साठा व विक्री सुरू असल्याने अन्न व औषध प्रशासनाने चार ठिकाणी धाडी टाकीत ४७ लाख ५६ हजार २२२ रूपयांचे साहित्य जप्त केले़ तेथील रेकॉर्ड जप्त करून त्याचा शोध घेतला असता शहरातील नामांकित आर्थोपेडिक दवाखान्यांना या ठिकाणाहून साहित्याचा पुरवठा होत असल्याचे निष्पन्न झाले़ त्यातील दोन एन्टरप्रायजेसच्या रेकॉर्डवरून जवळपास तीन आठवड्यापूर्वी ३२ आॅर्थोपेडिक डॉक्टरांना नोटिसा बजावल्या होत्या़ दरम्यान, या डॉॅक्टरांनी खुलासे सादर केले आहेत़ मात्र हे खुलासे साधारणत: एकाच पद्धतीचे आहेत़ त्यामुळे कुठलीही कारवाई करण्यात आली नाही़

Web Title: An orthopedic doctor will be an apology witness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.