नवीन शैक्षणिक धोरणावरील वेबिनारचे आयोजन
By | Updated: December 2, 2020 04:12 IST2020-12-02T04:12:08+5:302020-12-02T04:12:08+5:30
औरंगाबाद : नवीन शैक्षणिक धोरणाविषयी जाणून घेण्यासाठी सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच मुलांच्या भविष्याची चिंताही अनेकांना सतावत ...

नवीन शैक्षणिक धोरणावरील वेबिनारचे आयोजन
औरंगाबाद : नवीन शैक्षणिक धोरणाविषयी जाणून घेण्यासाठी सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच मुलांच्या भविष्याची चिंताही अनेकांना सतावत आहे. ४ थी ते ९ वीचे विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षक यांना दिशादर्शक ठरेल अशा शैक्षणिक वेबिनारचे आयोजन लोकमत कॅम्पस क्लब व ज्ञानदीप फाउंडेशन (डीएफसी) च्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. रविवार, ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजेदरम्यान वेबिनार हा होणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरणात काय असणार आहे. याविषयी सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. काहींना या धोरणातील काही मुद्दे समजले नाहीत. त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. त्यात कोणत्या परीक्षेला आता महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यादृष्टीने इयत्ता ४ थी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांना यापुढे कसे व कोणते शिक्षण मिळणार आहे. कोरोनामुळे बदललेली परिस्थिती लक्षात घेऊन वैद्यकीय व अभियांत्रिकी या अभ्यासक्रमाशिवाय भविष्यात कोणत्या क्षेत्रात करिअर करायला मोठी संधी उपलब्ध झाले आहे, असे अनेक प्रश्न मनात निर्माण झाले आहेत. यशस्वी करिअर जीवनासाठी नवीन शैक्षणिक धोरण समजून घेणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना दिशादर्शक ठरेल, असे मार्गदर्शन वेबिनारद्वारे करण्यात येणार आहे.
उल्लेखनीय म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातील मागील ३२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले ज्ञानदीप फाउंडेशन सेंटरचे संचालक गोविंद काबरा सर्वांना सोप्या व ओघवत्या भाषेत मार्गदर्शन करणार आहेत.
आता ऑनलाईन शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थांना स्वअध्ययन करावे लागणार आहे. त्याची गोडी निर्माण कशी करायची याचा गुरुमंत्रही देण्यात येणार आहे.
शिक्षण व करिअरकडे पाहण्याची नवी दृष्टी निर्माण करून देणाऱ्या या वेबिनारमध्ये विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी सहभागी व्हावे व आपल्या मित्र परिवार व नातेवाईक ज्यांचे पाल्य इयत्ता ४ थी ते ९ वीचे शिक्षण घेत आहेत, त्यांनाही सहभागी करून घ्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
चौकट
विनाशुल्क वेबिनार
शैक्षणिक वेबिनारचे विनाशुल्क आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम नाव नोंदणी करणाऱ्या १ हजार जणांना झूम ॲक्सेस आणि सेल्फ स्टडी चार्ट देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ९२२५३१८७२७ या नंबरवर संपर्क साधावा.