सखी मंचतर्फे श्रावण सोहळ्याचे आयोजन
By Admin | Updated: August 26, 2015 23:55 IST2015-08-26T23:55:17+5:302015-08-26T23:55:17+5:30
जालना : हिंदूसंस्कृतीमध्ये श्रावण महिना महत्त्वाचा मानला जातो. यानिमित्ताने लोकमत सखी मंचच्या वतीने सदस्यांसाठी श्रावण सोहळ्यात विविध स्पर्धा

सखी मंचतर्फे श्रावण सोहळ्याचे आयोजन
जालना : हिंदूसंस्कृतीमध्ये श्रावण महिना महत्त्वाचा मानला जातो. यानिमित्ताने लोकमत सखी मंचच्या वतीने सदस्यांसाठी श्रावण सोहळ्यात विविध स्पर्धा ३० आॅगस्ट रोजी खेरूडकर मंगल कार्यालय येथे संध्याकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आल्या आहेत.
या सोहळ्यात सदस्यांना श्रावण साज (फॅशन शो) उखाणे स्पर्धा, मेहंदी, थाळी सजावट, मंगळगौरी सादरीकरण या स्पर्धेत सहभाग घेऊन आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जास्तीत जास्त सदस्यांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन सखीमंचने केले आहे. फॅशन शोमध्ये स्पर्धकांनी पाना फुलापासून बनविलेले दागिने परिधान करणे बंधनकारक आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९२७१७१३२०२ या क्रमांकावर २८ आॅगस्टपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
स्पर्धेच्या ठिकाणी नाव ऐनवेळी नावनोंदणी करण्यात येणार नाही, असे आयोजकांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)