बारावी सायन्सच्या विद्यार्थी-पालकांसाठी मार्गदर्शक सेमिनारचे आयोजन

By Admin | Updated: December 18, 2015 23:30 IST2015-12-18T23:21:06+5:302015-12-18T23:30:32+5:30

नांदेड: बारावीचे वर्ष म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे वर्ष़ विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांनाही या वर्षाची काळजी वाटत असत़े़

Organizing seminars for students and parents of HSC Science | बारावी सायन्सच्या विद्यार्थी-पालकांसाठी मार्गदर्शक सेमिनारचे आयोजन

बारावी सायन्सच्या विद्यार्थी-पालकांसाठी मार्गदर्शक सेमिनारचे आयोजन

नांदेड: बारावीचे वर्ष म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे वर्ष़ विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांनाही या वर्षाची काळजी वाटत असत़े़ विशेष करुन सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या पाल्याला उत्तम गुण मिळवून चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा ही अपेक्षा असते़ त्यासाठी केवळ अभ्यासच नाहीतर परीक्षांचे स्वरुप ओळखून तयारी करणे गरजेचे आहे़
यावर्षीपासून इंजिनिअरिंग व मेडिकल अ‍ॅडमिशन ‘सीईटी’च्या आधारावर होणार आहेत़ परीक्षांमध्ये झालेल्या या बदलानुरुप अभ्यासतंत्र आणि पालक-विद्यार्थ्यांना याविषयी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ‘लोकमत’तर्फे व उएळ रूङ्म१ी इङ्मङ्म२३ी१ आणि विद्यालंकार यांच्या सौजन्याने ‘ऌरउ+उएळ यशाचा फॉर्म्युला’ सेमिनारचे आयोजन २३ डिसेंबर रोजी कुसुम सभागृह, व्हीआयपी रोड, नांदेड येथे करण्यात आले आहे़
या सेमिनारमध्ये बारावी सायन्सचे विद्यार्थी व पालकांना पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे व मार्गदर्शन तज्ज्ञांकडून मिळणार आहेत़ जसे सीईटीची तयारी कशी करायची, तिचे स्वरुप कसे असणार, बोर्ड आणि सीईटीच्या अभ्यासाचा ताळमेळ कसा घालायचा यासारखे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना असू शकतात़ ‘ऌरउ+उएळ दोहोंचाही पुरक अभ्यास कसा करायचा याचे तंत्र तज्ज्ञांकडून जाणून घेण्याची नामी संधी ऌरउ+उएळ यशाचा फॉर्म्युला’ सेमिनारमध्ये मिळणार आहे़
गेल्या दोन वर्षांपासून जेईई मेन्स व अ‍ॅडव्हान्स या आधारेच इंजिनिअरिंगचे प्रवेश दिले जाऊ लागले होते़ त्यानुसार विद्यार्थी अभ्यास करु लागले मात्र यंदा पुन्हा सीईटीच्या आधारावरच इंजिनिअरिंग व मेडिकलचे प्रवेश दिले जाणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास पद्धतीत थोडे बदल करावे लागणार आहेत़ हे बदल नीट समजावून सांगण्यासाठी ‘लोकमत’ ने हा कार्यक्रम आयोजित केला आहे़
ढँ८२्रू२, उँीे्र२३१८, ठ४ेी१्रूं’२ झटपट कशी सोडवावी, उरलेल्या मोजक्या दिवसांत बारावी (सायन्स) आणि उएळ ढँ८२्रू२, उँीे्र२३१८, ठ४ेी१्रूं’२ चा अभ्यास कसा बॅलेन्स करावा? बारावी (सायन्स) पेपर कसे लिहावेत? सीईटीचे प्रश्न क्षणात सोडविण्याच्या टिप्स आणि ट्रिक्सही विद्यार्थ्यांना सेमिनारमध्ये जाणून घेता येणार आहे़ त्यामुळे सर्व बारावी सायन्सच्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सेमिनारमध्ये नोंदणी करावी़ कार्यक्रमस्थळी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल़
सेमिनारमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना ‘विद्यालंकार’ तर्फे दोन हजार रुपयांचे डिस्काउंट कुपन देण्यात येणार आहे़ सेमिनारमध्ये जागा आरक्षित करण्यासाठी ९८२३०४७८१३ या क्रमांकावर संपर्क करावा़
‘लोकमत’ प्रस्तुत ‘ऌरउ+उएळ यशाचा फॉर्म्युला’
स्थळ - कुसुम सभागृह, व्ही़आय़पी़रोड, नांदेड.
बुधवार, २३ डिसेंबर २०१५, वेळ - सायंकाळी ५ वाजता

Web Title: Organizing seminars for students and parents of HSC Science

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.