एस्पायर एज्युकेशन फेअरचे आयोजन

By Admin | Updated: June 1, 2014 00:24 IST2014-05-31T23:44:47+5:302014-06-01T00:24:41+5:30

लातूर : सर्व शैक्षणिक संस्थेची माहिती देण्यासाठी खास आपल्यासाठी ६ ते ८ जून या कालावधीत लातूरच्या टाऊन हॉल मैदानावर ‘लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर’ चे आयोजन करण्यात आले आहे़

Organizing the Aspire Education Fair | एस्पायर एज्युकेशन फेअरचे आयोजन

एस्पायर एज्युकेशन फेअरचे आयोजन

लातूर : आपल्या पाल्याने कोणता कोर्स करावा, दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती, सर्व शैक्षणिक संस्थेची माहिती देण्यासाठी किती फिरावे लागणार , अनुदान मिळेल काय, असे एक ना अनेक प्रश्न सध्या पालकांच्या मनात घोळ निर्माण करीत असतील़ मात्र, आता आपल्या पाल्याच्या भावी करिअरची चिंता करणे सोडा कारण, खास आपल्यासाठी ६ ते ८ जून या कालावधीत लातूरच्या टाऊन हॉल मैदानावर ‘लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर’ चे आयोजन करण्यात आले आहे़ यानिमित्ताने सर्व नामांकित शैक्षणिक संस्थेची इत्यंभूत माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे़ विद्यार्थ्यांच्या भावी करिअरसाठी दिशादर्शक ठरणारे हे प्रदर्शन म्हणजे जणू शैक्षणिक कुंभमेळाच ठरणार आहे़ तसेच या उपक्रमाद्वारे व्यावसायिकांनाही हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचता येणार आहे़ शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेणार्‍या ‘लोकमत समुहा’तर्फे यंदाही एस्पायर एज्युकेशन फेअरचे आयोजन करण्यात आले आहे़ ६ ते ८ जूनदरम्यान भव्य शैक्षणिक प्रदर्शन भरणार आहे़ पालक असो वा पाल्य त्यांच्या मनात भावी शिक्षणाविषयीच्या अनेक शंका, कुशंका असतात़ त्या प्रत्येक शंकाचे निरसन या प्रदर्शनात होणार आहे़ शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ या प्रदर्शनात आपणास मार्गदर्शन करणार आहेत़ याशिवाय शैक्षणिक क्षेत्रातील महाविद्यालयाचे, शाळा, मेडिकल, इंजिनिअरींग, आर्किटेक्चरपासून फॅशन, ग्राफिक्स, इंटिरियर डिझाईनपर्यंत व रिटेल, आयटीआय, एव्हिएशनपासून मीडिया, अ‍ॅनिमेशन, गेमिंगपर्यंत तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, आयटीआय, हॉटेल, मॅनेजमेंट, फॉरेन लँग्वेज, पॉलिटेक्निकल, स्पोकन इंग्लिश, लॉ कॉलेज, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट हे सर्व इन्स्टिट्यूट प्रदर्शनात सहभागी होणार आहे़ एकाच ठिकाणी शैक्षणिक माहितीचा खजिनाच उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांचा वेळ व पैसा वाचणार आहे़ व्यावसायिकांसाठी हे प्रदर्शन म्हणजे सुवर्णसंधी ठरणार आहे़ कारण, एकाच छताखाली हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत आपल्या शैक्षणिक संस्थेची माहिती पोहोचविता येणार आहे़ प्रत्येकाशी वैयक्तिकरित्या संवाद साधून आपल्या उपक्रमाची माहिती देता येणार आहे़ यानिमित्ताने नवा वर्ग आपल्या संस्थेशी जोडला जाणार आहे़ मोजकेच स्टॉल शिल्लक असल्याने शैक्षणिक क्षेत्रातील व्यावसायिकांनी आजच आपला स्टॉल बुक करावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे़ अधिक माहितीसाठी गणेश : ८४२१४०५४५७, संतोष : ७३८५८८६५८६ या नंबरवर संपर्क साधावा़ (प्रतिनिधी) भेटवस्तू देणार प्रदर्शनाला भेट देणार्‍यांपैकी दररोज तीन भाग्यवंतांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणाऱ याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे़ १२ जिल्ह्यात प्रदर्शन लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर २०१४ हे राज्यस्तरीय प्रदर्शन १२ जिल्ह्यांमध्ये भरविण्यात येणार आहे़ यात औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, लातूर, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूरचा समावेश आहे़ सहप्रायोजक-डी.बी. ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्स.

Web Title: Organizing the Aspire Education Fair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.