शनिवारी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संमेलन लोकमत आयोजित उपक्रम
By Admin | Updated: August 7, 2014 01:30 IST2014-08-07T00:45:09+5:302014-08-07T01:30:26+5:30
नांदेड : ९ आॅगस्ट रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विद्यार्थी संमेलन आयोजिण्यात आले आहे़

शनिवारी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संमेलन लोकमत आयोजित उपक्रम
नांदेड : लोकमत नांदेड प्रिंटिंग युनिटच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ९ आॅगस्ट रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विद्यार्थी संमेलन आयोजिण्यात आले आहे़ कै़ डॉ़ शंकरराव चव्हाण सभागृहात तीन सत्रामध्ये हे संमेलन होईल़
लोकमतने शेती, शिक्षण आणि आरोग्य या महत्त्वपूर्ण विषयांवर विविध उपक्रम राबविण्याचा पायंडा निर्माण केला आहे़ त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी सकाळी १० ते दुपारी १२़३० दरम्यान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन होणार आहे़ त्यात पुणे येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तथा राजमुद्रा ग्रंथाचे लेखक प्रा़मनोहर भोळे तसेच नांदेडचे सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांचे मार्गदर्शन होणार आहे़ यावेळी प्रा़ भोळे हे 'एमपीएससी अभ्यास व काळजी' या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती देतील़ तसेच सहाय्यक पोलिस अधीक्षक देशमुख हे स्पर्धा परीक्षेचा दृष्टिकोन आणि दिशा यावर बोलतील़ विशेष म्हणजे उपस्थित विद्यार्थ्यांच्या निवडक प्रश्नांवर शेवटच्या सत्रात चर्चाही होणार आहे़
नांदेड शहरात राज्य लोकसेवा आयोग तसेच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे हजारो विद्यार्थी महाविद्यालय, अभ्यासिकांच्या माध्यमांतून स्पर्धेला सामोेरे जात आहेत़ मुंबई, पुण्याच्या बरोबरीने नांदेडच्या विद्यार्थ्यांनीही स्पर्धा परीक्षेत स्वत:चा ठसा निर्माण केला आहे़ त्याला जोड देणारा हा उपक्रम ठरेल असेही संयोजकांनी कळविले आहे़
दरम्यान, सदरील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संमेलन सर्व विद्यार्थ्यांसाठी खुले असून प्रथम येणाऱ्यांना प्रथम आसन असणार आहे़ तसेच तिन्ही सत्र वेळेवर सुरू होतील, असेही कळविण्यात आले आहे़
(प्रतिनिधी)