शासन निर्णयाची होळी करणार संघटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:29 IST2020-12-17T04:29:09+5:302020-12-17T04:29:09+5:30
औरंगाबाद : अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित, शाळेतील चतुर्थश्रेणी कर्मचारी यांच्या सेवा संपुष्टात तथा मानधनावर नियुक्ती, या सुधारित आकृतिबंधाच्या आदेशाची ...

शासन निर्णयाची होळी करणार संघटना
औरंगाबाद : अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित, शाळेतील चतुर्थश्रेणी कर्मचारी यांच्या सेवा संपुष्टात तथा मानधनावर नियुक्ती, या सुधारित आकृतिबंधाच्या आदेशाची होळी सोमवारी करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे.
--
बारावी परीक्षेच्या अर्ज
प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात
औरंगाबाद : बारावी परीक्षेच्या अर्जप्रक्रियेस मंगळवारपासून सुरुवात होत आहे. त्यासाठी वेळापत्रक राज्यमंडळाने जाहीर केले आहे. परीक्षेस विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पद्धतीने बोर्डाच्या संकेतस्थळावर भरता येतील. नियमित शुल्कासह १५ डिसेंबर ते ४ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.
---
एनटीएस परीक्षेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आणि एनसीईआरटी परिषद यांच्या वतीने घेण्यात येणारी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा शहरातील १८ केंद्रांवर रविवारी घेण्यात आली. शहरातून परीक्षेला ४ हजार ८१६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ४ हजार ७३३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षेत सर्व खबरदारी घेण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांनीही सर्व नियमांचे पालन केल्याचे पर्यवेक्षक वाय. एस. दाभाडे यांनी सांगितले.