संस्था चालकाने घेतला कर्मचाऱ्याला चावा

By Admin | Updated: February 4, 2015 00:42 IST2015-02-04T00:24:54+5:302015-02-04T00:42:09+5:30

बीड: येथील रुखमाई गोविंंद विद्यालयाचा वाद चिघळला असून संस्था चालकाने कर्मचाऱ्यांविरुद्ध तर कर्मचाऱ्यांनी संस्था चालकाविरुद्ध परस्पर विरोधी मारहाणीच्या तक्रारी

The organization took the bite to the employee | संस्था चालकाने घेतला कर्मचाऱ्याला चावा

संस्था चालकाने घेतला कर्मचाऱ्याला चावा


बीड: येथील रुखमाई गोविंंद विद्यालयाचा वाद चिघळला असून संस्था चालकाने कर्मचाऱ्यांविरुद्ध तर कर्मचाऱ्यांनी संस्था चालकाविरुद्ध परस्पर विरोधी मारहाणीच्या तक्रारी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात मंगळवारी दाखल केल्या आहेत.
शहरापासून नजीक असलेल्या रुखमाई गोविंद मतीमंद निवासी विद्यालय, शिवदरा येथे गोपीनाथ यादवराव काळकुटे कार्यरत आहेत. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, २२ डिसेंबर रोजी वडिलाचे निधन झाल्याने मी गैरहजर होतो. त्यानंतर रजेचा अर्ज दिला. संस्थाचालक व प्रभारी मुख्यध्यापक या दोघांनी अर्ज स्वीकारला नाही व तेव्हापासून ३ फेब्रवारी पर्यंत गैरहजर असल्याचे दाखविले आहे. दरम्यान, संस्थेच्या काही तक्रारींच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे. चौकशी अधिकारी यांची भेट घेण्यासाठी काळकुटे व संस्थेचे कर्मचारी गोरख डिसले, शाहू चांदणे, सिद्धेश्वर वाघमोडे, संजय राठोड, बाळू रावतारे मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गेले होते. पंचायत समितीच्या आवारात संस्था चालक शिवाजी चव्हाण यांची भेट झाली.
जानेवारीचे पगार व आम्हाला नौकरीवर हजर करुन घेणेबाबत विचारणा केली असता, शिवीगाळ करुन ‘तुम्हाला काय करायचे ते करा, मी तुम्हाला नौकरीवर हजर करुन घेत नाही ’असे म्हणून लाथा मारण्यास सुरुवात केली. त्यांच्या सोबत असलेले सुरेश धनवट व विठ्ठल मस्के यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर शिवाजी चव्हाण यांनी माझा डावा हात धरुन एका बोटाला चावा घेतला. त्यांच्या तक्रारीवरुन शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पीएसआय नागटिळक करीत आहेत. शिवाजी गोविंद चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एमआयडीसी भागातील व शिवदरा येथील रुखमाई गोविंद मतीमंद निवासी विद्यालय चालवित आहे. संस्थेतील कर्मचारी गोपीनाथ काळकुटे, शाहू चांदणे, अजिम हमीद पठाण, सुभाष निर्मळ, गोरख बिरवे, विजय बनसोडे, मनोहर करांडे, गणेश शिंदे, राजेश्वर पाटील, संजय राठोड, रंजीत खाडे, रणजीत जाधव, राहुल शिंदे, अशोक माळी, रामकिसन गर्कळ, बाळू तोटे हे कर्मचारी अडीच महिन्यांपासून गैरहजर आहेत. त्यामुळे त्यांचे जानेवारी महिन्याचे पगार समाज कल्याण खात्याने दिले नाहीत. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास पंचायत समिती येथे आलो असता वरील सर्वांनी पंचायत समिती येथे मला शिविगाळ केली व ‘तु आमचा पगार का काढला नाही’ म्हणून गोपीनाथ काळकुटे, संजय राठोड या दोघांनी चापटाने व बुक्क्यांनी मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पीएसआय नागटिळक करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The organization took the bite to the employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.