गॅस दाहिनीसाठी फेरनिविदा काढण्याचे शिर्डी संस्थानला आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:04 IST2021-06-11T04:04:27+5:302021-06-11T04:04:27+5:30
औरंगाबाद : शिर्डी येथे साईबाबा संस्थान ट्रस्टच्या वतीने गॅस दाहिनीसाठी फेरनिविदा मागविण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे ...

गॅस दाहिनीसाठी फेरनिविदा काढण्याचे शिर्डी संस्थानला आदेश
औरंगाबाद : शिर्डी येथे साईबाबा संस्थान ट्रस्टच्या वतीने गॅस दाहिनीसाठी फेरनिविदा मागविण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस डी कुलकर्णी यांनी संस्थानला दिला आहे .
गॅस दाहिनीसाठीच्या मे. कल्याणी एंटर प्राइजेसच्या ७४,२७,००० रुपयांच्या निविदेला परवानगी मागणाऱ्या दिवाणी अर्जाच्या अनुषंगाने खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला आहे. पुढील सुनावणी २२ जून रोजी ठेवण्यात आली आहे. खंडपीठाने आदेशात म्हटल्यानुसार खंडपीठाने १४ जानेवारी २०२१ च्या आदेशाद्वारे शिर्डी संस्थानला गॅस दाहिनी उभारून शिर्डी नगरपालिकेला हस्तांतरित करण्यास परवानगी दिली होती. तर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाच्या १ जानेवारी २०१६ चा ठराव आणि त्यातील ३.१.२.१.च्या अटीनुसार निविदा निर्धारित दरापेक्षा उणे २० टक्के आणि अधिक १० टक्के असेल तर निविदेची बोली स्वीकारावी. त्यापेक्षा जादा फरक असल्यास फेरनिविदा मागवावी, अशी तरतूद आहे, याकडे खंडपीठाचे लक्ष वेधले.
जिल्हाधिकाऱ्यांनी मांडलेल्या वरील बाबींचा विचार करून खंडपीठाने फेरनिविदेचा आदेश दिला. तसेच संस्थांच्या रुग्णालयातील आरटीपीसीआर प्रयोगशाळेसाठी आवश्यक ती सामग्री खरेदीची परवानगी खंडपीठाने दिली. खंडपीठाने वरील विषयाचे दोन्ही दिवाणी अर्ज निकाली काढले .
सदर प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. प्रज्ञा तळेकर व अजिंक्य काळे यांनी काम पाहिले तर शासनाच्या वतीने ॲड. डी आर काळे, तर संस्थांनच्या वतीने ॲड. अनिल बजाज यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. चैताली सेठ, ॲड. दियाना गाबा आणि ॲड. हर्षवर्धन बजाज यांनी सहकार्य केले.