८० टक्के अपंग लेखाधिकाऱ्याला ७७ लाख नुकसानभरपाई देण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:04 IST2021-04-11T04:04:57+5:302021-04-11T04:04:57+5:30
माेटार अ्पघात न्यायाधिकरणाचा आदेश औरंगाबाद : विरुद्ध दिशेने आलेल्या कारच्या धडकेने दुचाकीवरील खासगी कंपनीतील वरिष्ठ लेखाधिकारी प्रशांत सुखदेव ...

८० टक्के अपंग लेखाधिकाऱ्याला ७७ लाख नुकसानभरपाई देण्याचे आदेश
माेटार अ्पघात न्यायाधिकरणाचा आदेश
औरंगाबाद : विरुद्ध दिशेने आलेल्या कारच्या धडकेने दुचाकीवरील खासगी कंपनीतील वरिष्ठ लेखाधिकारी प्रशांत सुखदेव काळे ८० टक्के अपंग झाले होते . त्यामुळे नाेकरीही गमवावी लागली. त्यांना ७७ लाख ४३ हजार ६९६ रुपये नुकसानभरपाई म्हणून ९ टक्के व्याजासह देण्याचे आदेश औरंगाबादच्या माेटार अपघात न्यायाधिकरणाचे सदस्य ए. आर. कुरेशी यांनी दिले आहेत.
अहमदनगरमधील एक्ससाइड इंडस्ट्रिजमध्ये काळे वरिष्ठ लेखाधिकारी म्हणून कार्यरत हाेते. ९ नाेव्हेंबर २०१५ राेजी काळे नाेकरीवरून दुचाकीने घरी जात असताना केडगाव बायपास ते कल्याणराेडवर एका इनाेव्हा कारने जाेराची धडक दिली. या अपघातात काळे यांना ८० टक्के अपंगत्व आले व पाठीच्या मणकयास मारही लागला. शिवाय त्यांना नाेकरीही गमवावी लागली. या अपघातप्रकरणी दिलीप मारुती काळे यांच्या फिर्यादीवरून अहमदनगरच्या काेतवाली पाेलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नुकसानभरपाईसाठी प्रशांत काळे यांनी ॲड. संदीप राजेभाेसले यांच्यामार्फत कारचालक, मालक, दी न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीविराेधात औरंगाबादच्या माेटार अपघात न्यायधिकरणात अर्ज दाखल केला होता .