परंडा ‘बीईओं’च्या चौकशीचे आदेश
By Admin | Updated: March 17, 2017 00:30 IST2017-03-17T00:28:58+5:302017-03-17T00:30:40+5:30
परंडा : गटशिक्षणाधिकारी आर. व्ही. कदम हे दहावी परीक्षेच्या कालावधीत गैरहजर राहिल्याने चौकशी करण्याचे आदेश आहेत.

परंडा ‘बीईओं’च्या चौकशीचे आदेश
परंडा : येथील गटशिक्षणाधिकारी तथा एसएससी बोर्ड तालुका परिरक्षक आर. व्ही. कदम हे ऐन दहावी परीक्षेच्या कालावधीत विनारजा गैरहजर राहिल्याने उत्तरपत्रिका कस्टडीला पर्यायी व्यक्तीची व्यवस्था करून याबाबत चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. या अनुषंगाने गटविकास अधिकाऱ्यांनी गुरूवारी उत्तरपत्रिका कस्टडीला भेट देवून हजेरी रजीस्टरची पाहणीही केली.