अपहरणाच्या चौकशीचे आदेश

By Admin | Updated: July 1, 2014 01:03 IST2014-07-01T00:37:07+5:302014-07-01T01:03:46+5:30

लातूर : अहमदपूर येथे झालेल्या अपहरण प्रकरणाची चौकशी करण्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आदेश दिले आहेत.

Order of kidnapping inquiry | अपहरणाच्या चौकशीचे आदेश

अपहरणाच्या चौकशीचे आदेश

लातूर : अहमदपूर येथे झालेल्या अपहरण प्रकरणाची चौकशी करण्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आदेश दिले आहेत. अपहरण झालेल्या त्या व्यक्ती २६, २७, २८ व २९ जून रोजी कोठे होत्या? या अपहरणाची सत्यता काय? याची तपासणी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी उपविभागीय पोलिस अधिकारी व अहमदपूरच्या पोलिस निरीक्षकांना दिले आहेत.
ज्यांचे अपहरण झाले आणि ज्यांच्यावर या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांच्यात एकमेकांवर यापूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत. अपहरण केल्याचा गुन्हा संजय कांबळे यांच्यावरही दाखल आहे. मात्र २५ ते २९ जूनपर्यंत ते अहमदपूर तालुक्यात नव्हते. बाहेरगावी होते. मग त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा कसा दाखल झाला, यासंबंधी चौकशी करावी, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक बी.जी. गायकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
अपहृतांची मोबाईल तपासणी
२६ रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर अपहरणकर्ते कुठे होते. त्यांनी कोणाशी संपर्क साधला का, हेही तपासून पडताळणी केली जाईल.

Web Title: Order of kidnapping inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.