शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
3
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
4
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
5
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
6
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
7
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
10
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
11
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
12
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
13
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
14
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
15
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
16
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
17
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
18
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
19
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
20
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आदेशाला केराची टोपली

By admin | Updated: January 20, 2015 01:28 IST

औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) परिसर दलालमुक्त करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी आरटीओ कार्यालयांना दिले आहेत.

औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) परिसर दलालमुक्त करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी आरटीओ कार्यालयांना दिले आहेत. परंतु सोमवारी अनेक दलाल मंडळी बिनधास्त कामे करताना दिसून आली. त्यामुळे आरटीओ कार्यालय परिवहन आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवीत आहे.कार्यालयात अनधिकृत व्यक्ती येऊन वाहन मालकांच्या वतीने वाहनांची नोंदणी, हस्तांतर नोंद, नाहरकत प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्रांचे नूतनीकरण, लर्निंग, पर्मनंट लायसन्स काढणे, अशी कामे करून घेत आहेत. १आरटीओ कार्यालयातील दरवाजा बंद ठेवण्यात येत असल्याने दलालांना आतमध्ये येता येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु कार्यालयाच्या परिसरात खुर्च्या टाकून, रिक्षा, चारचाकी वाहनांमध्ये बसून दलाल मंडळी कामे करीत आहेत. अशांना कोण हटविणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.२आरटीओ कार्यालयातील कामकाजाविषयी सहज कल्पना येत नसल्याने सोमवारी अनेक वाहनधारकांची गैरसोय होत असल्याचे चित्र दिसून आले. विविध कामे स्वत:च पूर्ण करण्यासाठी त्याची सहज माहिती मिळण्याची गरज आहे. परंतु आरटीओ कार्यालयात याची कोणतीही सुविधा नसल्याने वाहनधारकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.दलाल बनणार प्रतिनिधीगेल्या अनेक वर्षांपासून वाहन मालकांचे प्रतिनिधी म्हणून अनेक जण काम करीत आहेत. परिवहन आयुक्तांच्या आदेशानंतर आता दलाल मंडळीही वाहन मालकांचे प्रतिनिधी (अधिकारपत्रधारक) म्हणून कामे करणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.