खाजगी जागेवरील वीज मीटर हलविण्याचे जीटीएलला आदेश

By Admin | Updated: August 17, 2014 01:41 IST2014-08-17T01:08:32+5:302014-08-17T01:41:55+5:30

औरंगाबाद : वीज ग्राहकाची परवानगी न घेता खाजगी जागेत बसविण्यात आलेले वीज मीटर कोणतेही चार्जेस न आकारता काढण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार मंचाने जीटीएल कंपनीला दिला आहे.

Order GTL to move electric meter to private space | खाजगी जागेवरील वीज मीटर हलविण्याचे जीटीएलला आदेश

खाजगी जागेवरील वीज मीटर हलविण्याचे जीटीएलला आदेश

औरंगाबाद : वीज ग्राहकाची परवानगी न घेता खाजगी जागेत बसविण्यात आलेले वीज मीटर कोणतेही चार्जेस न आकारता काढण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार मंचाने जीटीएल कंपनीला दिला आहे. तसेच ग्राहकास झालेल्या मानसिक त्रासापोटी १ हजार रुपये अदा करण्याचेही आदेशात नमूद केले आहे.
उत्कानगरीतील चेतन संकु लाच्या तळमजल्यावर असलेल्या २२ दुकानांचे वीज मीटर पार्किंगच्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. मीटरची जोडणी ते दुकानांदरम्यान लोंबकळणाऱ्या इलेक्ट्रिक वायरिंग धोकादायक आहे. वीज ग्राहक अभय कमलकिशोर नागोरी यांनी दुकानासाठी असलेले मीटर हलविण्यात यावे, अशी मागणी कंपनीकडे केली. तेव्हा महावितरणने त्यांची फ्रँचायझी असलेल्या जीटीएल कंपनीला मीटर हलविण्याबाबत कळविले होते. जीटीएलने त्यांच्या अर्जाची दखल घेतली नाही. तसेच मीटर हलविण्याठी ७० हजार रुपये भरले तरच ते हलविण्याची तयारी दर्शविली. नागोरी यांनी वीज ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. तक्र्रारीची सुनावणी मंचाचे सचिव गौळकर, सदस्य विलास काबरा यांच्यासमोर होऊन त्यांनी वरील आदेश दिले.


 

Web Title: Order GTL to move electric meter to private space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.