२४१ शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचे आदेश
By Admin | Updated: July 18, 2014 01:50 IST2014-07-18T01:06:21+5:302014-07-18T01:50:53+5:30
नांदेड : न्यायालयाच्या आदेशानंतरही किनवट तालुक्यातील २४१ शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास बँका नकार दिले़.

२४१ शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचे आदेश
नांदेड : न्यायालयाच्या आदेशानंतरही किनवट तालुक्यातील २४१ शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास बँका नकार देत असल्याची तक्रार आल्यानंतर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी सभापती राठोड व आ. प्रदीप नाईक यांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेत शेतकऱ्यांना कर्जवाटपाचे आदेश दिले़
किनवट तालुक्यातील डोंगरगाव, शिवणी, बेलोरी, धानोरा, माळकोल्हारी, बोधडी खु़ थारा, दिग्रस, जलधारा या गावातील शेतकऱ्यांना पीककर्ज दिले जात नव्हते़ त्यावेळी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या किनवट शाखेच्या कारभाराविरूद्ध उपरोक्त गांवानी २४१ शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती़ त्यावेळी न्यायालयाने शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे आदेश बँकेला दिले़ या आदेशानंतरही कर्ज देण्यास टाळाटाळ होत होती़ शेतकऱ्यांनी आ़ प्रदीप नाईक, जि़ प़ चे कृषी सभापती राठोड यांच्याकडे तक्रार केली़ त्यावेळी १६ जुलै रोजी अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांसह स्टेट बँक आॅफ इंडियाच्या किनवट शाखेचे अधिकारी, शेतकरी, जि़ प़ चे कृषी विकास अधिकारी एम़ टी़ गोंडस्वार व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली़ त्यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार २४१ शेतकऱ्यांना पीककर्ज मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला़ या निर्णयाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले़
(प्रतिनिधी)