शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतीचौक उड्डाणपुलावरील खड्डे  रस्ते विकास महामंडळाने बुजविण्याचे खंडपीठाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 19:40 IST

शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात दाखल जनहित याचिकेवरील सुनावणीत खंडपीठाने विविध कामांचा आढावा घेतला.

औरंगाबाद :  क्रांतीचौक उड्डाणपुलावरील खड्डे बुजविण्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी.व्ही. नलावडे व न्या. विभा कंकणवाडी यांनी दिले. 

खंडपीठात अ‍ॅड. रूपेश जैस्वाल यांच्या शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात दाखल जनहित याचिकेवरील सुनावणीत खंडपीठाने विविध कामांचा आढावा घेतला. राज्य रस्ते विकास महामंडळाने क्रांतीचौक उड्डाणपुलावरील खड्डे बुजवावेत या खंडपीठाच्या आदेशामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.  शिवाजीनगर येथील रेल्वेलाईनखालून जाणारा भुयारी मार्ग तीन मीटर उंचीचा असावा की, चार मीटर, यावर महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त पाहणीत एकमत न झाल्याने यावर एकत्रित बैठक घेऊन निर्णय करण्यात येईल, असे म्हणणे सार्वजनिक बांधकाम विभागाने मांडल्यानंतर खंडपीठाने ते म्हणणे रेकॉर्डवर घेतले. 

क्रांतीचौक ते रेल्वे स्टेशन या २०१५ मध्ये व्हाईट टॅपिंगच्या ३० कोटी रुपये खर्च करून तयार झालेल्या रस्त्यावर ३९ कोटी रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावाविरोधात अ‍ॅड. जैस्वाल यांनी खंडपीठात आक्षेप अर्ज दाखल केला. एकीकडे रस्ते बांधण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे एकाच रस्त्यासाठी ३९ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित केला जातो. हा निधीइतर  रस्त्यांवर खर्च करावा, अशी विनंती अर्जात करण्यात आली. गोलवाडी  रेल्वे उड्डाणपुलाच्या सुनावणीत रेल्वेतर्फे अ‍ॅड. मनीष नावंदर यांनी सांगितले की, २० कोटी रुपयांच्या कामासाठी रेल्वेची एका विशेष समितीची परवानगी लागते.

अतिक्रमणाविरुद्ध कारवाई ; शासनाने मागितली माहिती शहरातील उड्डाणपुलाखालील अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात काय कारवाई केली, याबाबत शपथपत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे आदेश खंडपीठाने राज्य शासनाला दिले आहेत. पुढील सुनावणी ४ जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादkranti chowkक्रांती चौकhighwayमहामार्गAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ