प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठताक्रमाने नियुक्तीसाठी उमेदवारांचा विचार करण्याचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:05 IST2021-05-07T04:05:06+5:302021-05-07T04:05:06+5:30
अंगद शितोळ यांच्यासह १२ जणांनी ॲड. आनंदसिंह बायस यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते की, निवड ...

प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठताक्रमाने नियुक्तीसाठी उमेदवारांचा विचार करण्याचा आदेश
अंगद शितोळ यांच्यासह १२ जणांनी ॲड. आनंदसिंह बायस यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते की, निवड झालेले उमेदवार कागदपत्रे तपासणीत अपात्र ठरल्यास त्यानंतरच्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल, असे जाहिरातीमध्ये म्हटले होते. २१५ जणांनी नियुक्ती स्वीकारली नाही . ९४७ उमेदवारांपैका केवळ ९२३ कागदपत्रे तपसाणीस हजर होते. १६६ अपात्र ठरले आणि ५० उमेदवारांना नियुक्ती मिळूनही त्यांनी स्वीकारली नाही. अशा परिस्थितीत जाहिरातीप्रमाणे प्रतीक्षा यादी तयार करून नियुक्ती देणे आवश्यक होते, असा युक्तिवाद ॲड. बायस यांनी केला. प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती मागण्याचा अधिकार नसल्याचा युक्तिवाद एमएसईबीच्या वतीने करण्यात आला. खंडपीठाच्या आदेशानुसार वीज कंपनीने तीन शपथपत्रे सादर करूनही त्यात नियुक्तीसंंबधी काहीच स्पष्ट केले नाही. सुनावणीअंती खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. आनंदसिंह बायस, राजेश मालोद, सत्यभामा आव्हाड, अर्चना भांगे यांनी काम पाहिले. राज्य शासनाच्या वतीने ॲड. अतुल काळे, यांनी काम पाहिले.