टंचाईबाबत दक्ष राहण्याचे आदेश
By Admin | Updated: July 12, 2014 00:44 IST2014-07-12T00:44:08+5:302014-07-12T00:44:08+5:30
वसमत : विभागीय आयुक्त संजीवकुमार जैस्वाल यांनी वसमत येथे गुरूवारी जिल्हास्तरीय आढावा बैठक घेतली. बैठकीत टंचाईसदृश्य परिस्थितीचा आढावा घेतला

टंचाईबाबत दक्ष राहण्याचे आदेश
वसमत : विभागीय आयुक्त संजीवकुमार जैस्वाल यांनी वसमत येथे गुरूवारी जिल्हास्तरीय आढावा बैठक घेतली. बैठकीत टंचाईसदृश्य परिस्थितीचा आढावा घेतला व आगामी काळात चाराटंचाई होणार नाही. याची खबरदारी घेण्याच्या व जिल्ह्यात वैरण विकास प्रकल्प राबवण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले.
वसमत तहसील कार्यालयात गुरूवारी विभागीय आयुक्तांनी जिल्हास्तरीय आढावा बैठक घेतली. बैठकीस विभागीय आयुक्त संजीवकुमार जैस्वाल, उपायुक्त पापळकर, जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी पवार, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उंबरकर, वन अधिकारी राठोड, उपविभागीय महसूल अधिकारी अनुराधा ढालकरी, तहसीलदार डॉ. अरविंद नरसीकर, गटविकास अधिकारी साहेबराव कांबळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीनिवास कोतवाल यांच्यांसह जिल्हाभरातील विविध खात्यांचे अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा मांडला.
विभागीय आयुक्त संजीवकुमार जैस्वाल यांनी पाणीटंचाई, चाराटंचाई व दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू करा, चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर वैरण विकास प्रकल्प राबवा, अशा सूचना दिल्या.
कृषी विभाग, वनविभाग व पशुसंवर्धन विभागाकडून चारा, बियाणांचे वाटप त्वरित करण्याचे आदेशही आयुक्तांनी यावेळी दिले.
वसमत तहसील कार्यालयातील महिला कक्ष, माहिती कक्ष व रेकॉर्ड कक्षाचे उद्घाटन विभागीय आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन तहसीलदार अरविंद नर्सीकर यांनी केले. (वार्ताहर)
अभिलेखा कक्ष पाहणी
विभागीय आयुक्त संजीवकुमार जैस्वाल यांनी जिल्हास्तरीय बैठक घेऊन टंचाईसदृश्य परिस्थितीचा आढावा घेतला
वसमत तहसील कार्यालयातील महिला कक्ष, माहिती कक्ष व रेकॉर्ड कक्षाचे उद्घाटन विभागीय आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.