बाल संरक्षण समित्या नेमण्याचे आदेश
By Admin | Updated: March 17, 2015 00:43 IST2015-03-17T00:10:48+5:302015-03-17T00:43:15+5:30
बीड : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींतर्गत गावात बाल संरक्षण समिती नेमण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी दिले

बाल संरक्षण समित्या नेमण्याचे आदेश
बीड : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींतर्गत गावात बाल संरक्षण समिती नेमण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा बाल संरक्षण समितीची बैठक झाली.
जिल्ह्यातील १०१९ ग्रामपंचायती पैकी १९० ग्रामपंचायतींमध्ये आतापर्यंत बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आली आहे. उर्वरित ग्रामपंचायतींनी मात्र मागील तीन महिन्यांमध्ये बाल संरक्षण समिती स्थापन करण्याच्या कुठल्याच हालचाली केलेल्या नाहीत. जिल्ह्यातील बाल लैंगिक अत्याचार, बाल विवाह, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी एकात्मिक बाल संरक्षण योजना यांची अंमलबजावणी करण्यासाठी गाव तेथे समिती स्थापन करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. या समितीच्या अध्यक्षपदी संबंधित ग्रामपंचातयतींचे सरपंच राहतील. (प्रतिनिधी)