खडकाळ जमिनीवर फुलविली आवळ्याची बाग
By Admin | Updated: October 29, 2014 00:43 IST2014-10-29T00:27:42+5:302014-10-29T00:43:47+5:30
जाफराबाद : कधीकाळी जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयोगात न येणाऱ्या पडिक, खडकाळ जमिनीचा देखील पांग फेडत नळविहरा येथील प्रगतशील शेतकरी संजय पा. मोरे व हरिश पा. मोरे या दोघा बांधवांनी

खडकाळ जमिनीवर फुलविली आवळ्याची बाग
जाफराबाद : कधीकाळी जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयोगात न येणाऱ्या पडिक, खडकाळ जमिनीचा देखील पांग फेडत नळविहरा येथील प्रगतशील शेतकरी संजय पा. मोरे व हरिश पा. मोरे या दोघा बांधवांनी आधुनिक तंत्रज्ञानातून अवळा शेती उभी केली आहे. विना खर्चात पहिल्या वर्षी ६० क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन मिळणार असून किमान एक लाखभर उत्पन्न यातून मिळेल, अशी अपेक्षा आहे.
गेल्या आठ वर्षांपूर्वी टाकाऊ जमिनीचा उपयोग कसा करावा, हा प्रश्न समोर असताना नापीक जमिनीचा उपयोग कसा द्यावा म्हणून २००७ मध्ये पडिक चार एकर जमिनीमध्ये एक हजार अवळा रोपाची लागवड करून विना औषध खताचा खर्च न करता ठिबकद्वारे पाणी देवून बाग जगवत दरवर्षी यामधून लाखोंचे उत्पन्न मिळेल, अशी सोय झाली आहे. या वर्षात एक हजार झाडांपैकी पाचशे झाडांना अवळा लागला असून, एका झाडास किमान २५ किलो अवळा निघणार आहे.
बाजार भावाप्रमाणे हजार रुपये मिळाला तरी लाखापेक्षा अधिक उत्पन्न मिळणार आहे. मात्र, यापुढे या बागेतून एका झाडामागे एक क्विंटल उत्पादन मिळून दहा पटीने उत्पादन मिळणार असे मोरे बंधू यांचे म्हणणे आहे. चार एकर अवळा शेतीमध्ये १६ बाय ११ मध्ये या अंतरावर लागवड करून तब्बल आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर यश फळाला आले.
शिवाय मोरे बंधू यांनी त्यांच्या जोडीला डाळींब, सीताफळ, केसर आंबा फळबाग घेऊन या वर्षात केसर आंब्यातून विक्रमी उत्पादन मिळविले आहे. (वार्ताहर)