शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद ! ऑनलाईन अभ्यासाला पर्याय; मुले गिरवताहेत ओट्यावर बसून धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 19:43 IST

जि.प. शिक्षण विभागाने पूर्व प्राथमिक तसेच दुसरी-तिसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवण्यास प्रतिबंध घातला आहे. 

ठळक मुद्देगारखेडा बीटमध्ये जिल्हा परिषदेचा पथदर्शी प्रयोग  ४२ जि.प. शाळांचे विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. 

- विजय सरवदे

औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये सर्वच क्षेत्रांत ऑनलाईन कामाचा ट्रेण्ड आला आहे. यापासून शिक्षणही दूर राहिले नाही. मात्र, ऑनलाईन अभ्यास करताना बच्चेकंपनीच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर परिणाम होतो म्हणून जि.प. शिक्षण विभागाने गावातील ४-५ मुलांचा समूह करून ओट्यावर त्यांच्याकडून अभ्यास करून घेण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला असून, त्याचा सकारात्मक परिणामही दिसून येत आहे. 

त्याचे झाले असे की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा कधी सुरू होतील, हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. याबाबत शासनसुद्धा संभ्रमात आहे. त्यामुळे अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी प्रामुख्याने ‘सीबीएसई’ शाळांनी ‘झूम अ‍ॅप’ किंवा ‘गुगल मीट’च्या माध्यमातून ऑनलाईन क्लास सुरू केले आहेत. मात्र, शासनाच्या निर्देशानुसार जि.प. शिक्षण विभागाने पूर्व प्राथमिक तसेच दुसरी-तिसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवण्यास प्रतिबंध घातला आहे. 

यावर उपाय म्हणून ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी रमेश ठाकूर यांनी एक अभिनव उपक्रम शिक्षण विभागाला सुचविला. भौगोलिकस्तरावर गावातील जि.प. शाळेच्या ४-४, ५-५ विद्यार्थ्यांचे लहान-लहान गट तयार करायचे. गावातीलच एखाद्या शिक्षित व्यक्तीकडून या गटाला फिजिकल डिस्टन्सचा नियम पाळून लिहायला, वाचायला शिकवायचे. जो हे काम करतो त्यास पालकमित्र किंवा विद्यार्थीमित्र, असे संबोधले जाते. विद्यार्थीमित्र अथवा पालकाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर किंवा जिथे इंटरनेटची रेंज कमी येते, अशा गावात शाळेचे शिक्षक काय शिकवायचे ते फोनवर सांगतात. हा उपक्रम सध्या १५ जूनपासून प्रायोगिक तत्त्वावर औरंगाबाद तालुक्यातील गारखेडा बीटमध्ये राबविला जात असून ४२ जि.प. शाळांचे विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. 

...तर १ जुलैपासून सर्व जि.प. शाळांमध्ये हा प्रयोगयासंदर्भात शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल यांनी सांगितले की, ग्रामीण भागात जर कोरोनाचा संसर्ग कमी झाला किंवा सध्यासारखी परिस्थिती राहिली, तर १ जुलैपासून हा पथदर्शी उपक्रम जिल्ह्यातील सर्व जि.प. शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्याचा मानस आहे. यामुळे उपक्रमामुळे मुले शेतीत, जनावरामागे जाणे किंवा उनाडक्या करण्याऐवजी अभ्यासात रमतात. शिक्षणमंत्री, शिक्षण सचिवांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे. 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थीcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण